कृषी व पलाश महोत्वाचे थाटात उदघाटन,शेतकर्यांचा प्रतिसाद

0
25

गोंदिया,दि.२4 :बदलत्या पिरस्थितीत शेतकर्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे,कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी तसेच त्याना प्रोत्साहन मिळण्यासोबतच प्रयोगशिल व प्रगतिशिल शेतकèयांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी गोंदिया-आमगाव मार्गावरील नागपूरे बगीचापरिसरात आयोजित कृषी व पलाश महोत्सवाचे उदघाटन जिल्हा परिषद अध्यक्ष सीमा मडावी यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती शैलजा सोनवाने या होत्या.तर यावेळी पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजा दयानिधी,जिल्हा बँकेचे संचालक व प्रगतशिल शेतकरी रेखलाल टेंभरे,माजी जिल्हा उपनिबंधक लखनसिंह कटरे,प्रगतीशिल शेतकरी मोहीनी निंबार्ते,उद्योजक प्रकाश रहागंडाले,देविदास नारनवरे,सहाय्यक गटविकास अधिकारी व प्रभारी कृषी विकास अधिकारी टेंभरे,सेवा सहकारी संस्था कटंगीचे अध्यक्ष हरिणखेडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.या महोत्सवाचे आयोजन २३ ते २७ फेबुवारीपर्यंत करण्यात आले असून पहिल्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी बांधवानी हजेरी लावली होती.महोत्सवस्थळी शेतकèयांना कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी. यासाठी कृषी अवजारे, कीटकनाशके यांच्यासह बचत गटांनी तयार केलेल्या वस्तुंचे स्टॉल लावण्यात आले आहेत.