शेतकरी सन्मान निधी योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा- तहसिलदार राठोड

0
16

आमगांव,दि.25ः- केंद्र सरकारने शेतकर्‍यांना आर्थिक अनुदान सहा हजार रुपये.देण्याची घोषणा केली.त्या घोषणेच्या अनुषंगाने पहला हप्ता दोन हजार रुपये आनलाईन द्वारे शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात जमा करण्यास सुरवात झाली असून शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन तहसिलदाल साहेबराव राठोड यांनी केले.ते येथील नगर परिषद सभागृहामध्ये आयोजित शेतकरी सन्मान निधी प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात बोलत होते.

महसुल व कृषीविभागाच्यावतीने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राठोड पुढे म्हणाले की तालुक्यातील 83 गावामध्ये प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी 15,528 अर्ज प्राप्त झाले.त्यापैकी 14,215 अर्ज पात्र झाले आहेत.त्यानुसार तालुक्यातील 437 शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात पहिला 2 हजाराचा हप्ता आनलाईनद्वारे जमा करण्यात सुरवात झाली आहे.तसेचा दुसरा हप्ता 1135 शेतकऱ्यांच्या बॅक खात्यात महीन्या अखेरपर्यंत जमा होणार आहे.कार्यक्रमाला बिडीओ चंद्रकांत सांब,जिल्हा परिषद सदस्या उषाताई मेंढे,शोभेलाल कटरे,पं.स.सदस्य छबबुताई उके, इसुलाल भालेकर,नायब तहसिलदार नागपूरे, मोहिनी निबार्ते उपस्थित होते.कार्यक्रमात शेतकर्यांना दोन हजार रुपये आनलाईन द्वारे खात्यात जमा होणारे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक,संचालन व आभार तालुका कृषी अधिकारी लाखन बनसोड यानी केले.आयोजनासाठी मंडळ कृषी अधिकारी प्रविण मुंडे,कृषी सहायक जि.एल.शेंडे,नितीन मुंडे,प्रियंका बावणकर,इंदुताई सुर्यवंशी,वैभव शहारे,राहुल सेंगर,महसुल विभागाचे मंडळ अधिकारी-कठाणे व बारसे यांनी सहकार्य केले.