कृषी महोत्सवातील गावराण कोंबड्याचे मटण ठरतेय नागरिकांची पसंती

0
28

गोंदिया,दि.25ःः बदलत्या पिरस्थितीत शेतकर्यांच्या बांधापर्यंत आधुनिक कृषी तंत्रज्ञान पोहचावे,कृषी विषयक घडमोडींची माहिती त्यांना मिळावी तसेच त्याना प्रोत्साहन मिळण्यासोबतच प्रयोगशिल व प्रगतिशिल शेतकèयांच्या माध्यमातून विचारांची देवाणघेवाण व्हावी यासाठी गोंदिया-आमगाव मार्गावरील नागपूरे बगीचापरिसरात आयोजित कृषी व पलाश महोत्सवाचे आयोजन गेल्या दोन दिवसापासून करण्यात आले आहे.या आयोजनात गावखेड्यातील बचतगटासंह वैयक्तिक लाभार्थी शेतकर्यांनाही स्टाॅल लावण्याची संधी मिळालेली आहे.कृषी साहित्य,भाजीपाला,शेतीपुरक साहित्यासह इतर स्टाॅलला ज्याप्रमाणे गर्दि असते तीच गर्दी मात्र यावेळी सुमारे 10-15 संख्येत असलेल्या भोजनालयाच्या स्टाॅलवरही बघावयास मिळते.त्यातही गोंदिया शहर परिसरातील या महोत्सवात अवघ्या 50 रुपयात फुलप्लेट गावरान देशी कोंबड्याची मटन करी आणि मासोळीची भाजी नागरिकांच्या पंसतीला पडली असून दुपारपासून रात्री कार्यक्रम संपेपर्यंत या स्टाॅलकडे बहुतांश व्हिजीटर सहकुटुंब या देशी कोंबडीच्या मटनाचा आस्वाद घेतांना दिसून येत आहेत.विशेष म्हणजे गोंदिया शहरातील अनेक हाॅटेलात देशी चिकनच्या नावावर बायलर किंवा काॅकरेलचे चिकन दिले जाते ते सुध्दा 100 ते 150 रुपये प्लेटच्याही वर मात्र या कृषी महोत्सावत गावातून आलेल्या या महिला बचतगट व कुक्कुटव्यवसायिकांनी अवघ्या 50 रुपये प्लेटमध्ये आपल्या घरातील स्वाद मिळेल असे देशी चिकन उपलब्ध करुन देत असल्याने एकच गर्दी बघावयास मिळत आहे.त्यातच रात्रीला ग्रामीण भागातील संस्कृतीचे दर्शन घडविणारे नृत्य व नाटिका महिला बचत गटाच्या सदस्या सादर करतांना दिसून येत आहेत.अवघे दोन दिवस समारोपाचे उरलेल्या या कृषी महोत्सावचा लाभ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक पर्वणी ठरत असून शहरवासियांसाठीच नव्हे तर खवय्यासांठीही आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे.