गोंदिया-भंडारातील कृषी उत्पन्न बाजार समितीचे व्यवहार ठप्प

0
35

गोंदिया/भंडारा,दि.01 मार्च : कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्यात यावे. या मागणीला घेऊन बाजार समितीमध्ये कार्यरत हंगामी व रोजंदारी कर्मचाऱ्यांनी गुरूवारपासून(दि.२८) काम बंद आंदोलन सुरू केले. त्यामुळे गोंदिया व भंडारा जिल्ह्यातील बाजार समितीतील व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते.भंडारा जिल्ह्यातील चारही बाजार समित्यांसह उपबाजार समित्यांचे कामकाज ठप्प पडले आहेत. मुंबई येथील आझाद मैदानात सुरु असलेल्या या आंदोलनात जिल्ह्यातील ४२ कर्मचारी सहभागी झाले आहेत.राज्यात ३०७ कृषी उत्पन्न बाजार समितीमधील ६८७७ कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत इतर राज्याप्रमाणेच सामावून घ्यावे या मागणीला घेऊन बाजार समितीचा कर्मचारी संघटनेने लढा पुकारला आहे.
जिल्ह्यात गोंदिया, आमगाव, देवरी, अर्जुनी मोरगाव, सडक अर्जुनी, तिरोडा व गोरेगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समिती असून या बाजार समित्यांमधून धानासह इतर शेतमालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहार होतात. जवळपास खरीप हंगामा दरम्यान दररोज हजार क्विंटलवर धानाची खरेदी विक्रीे केली जाते. या सातही बाजार समित्यामंध्ये हंगामी व रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कर्मचारी कार्यरत आहे. या कर्मचाºयांनी शासकीय सेवेत सामावून घेवून त्यांना शासकीय कर्मचाºयांप्रमाणे सोयी सुविधा देण्याची मागणी केली होती. मात्र याची अद्यापही दखल घेण्यात आली नव्हती. त्यामुळे कर्मचाºयांनी २८ फेब्रुवारीपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.मात्र यानंतरही शासनाने कुठलाच निर्णय घेतला नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे हंगामी व रोजंदारी असे ४०० वर कर्मचारी गुरूवारपासून बेमुदत संपावर गेले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्णपणे ठप्प झाले होते. यामुळे लाखो रुपयांचे व्यवहार सुध्दा खोळंबले होते. दरम्यान कर्मचाºयांच्या या आंदोलनाचा फटका बाजार समितीत शेतमालाची विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकºयांना बसला. त्यांना आल्या पावलीच परत जावे लागले.
आंदोलनात सहभागी कर्मचाºयांनी सकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर निदर्शने करुन विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा उपनिबंधक यांना दिले.
अर्जुनी मोरगाव बाजार समितीमध्ये ८ कर्मचारी स्थायी असून ३६ कर्मचारी रोजंदारी म्हणून कार्यरत आहेत. कर्मचारी संपावर गेल्याने कार्यालयीन कामकाज पूर्णत: ठप्प पडले आहे. रोजंदारी कर्मचारी शेतमाल तपासणी नाक्यावर तैनात असून आपली कामगिरी बजावताना दिसून आले. बाजार समितीच्या कार्यालयीन कामावर सुध्दा कर्मचाºयांच्या आंदोलनाचा प्रभाव दिसून आला.