त्रासाला कटांळून मनरेगा सहा.कार्यक्रम अधिकाèयाचा राजीनामा

0
16
गोंदिया,दि.0२-महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत आमगाव पचांयत समिती कार्यालयात कार्यरत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी लालबहादुर चौव्हान यांनी लोकप्रतिनिधी कामासाठी एकीकडे दबाव घालत आहेत.तर रोहयो उपजिल्हाधिकारी यांनी मला न विचारता आपल्या मर्जींने तुम्ही सुरु केलेल्या कामावरील झालेल्या खर्चाची वसुली करण्याची धमकी दिल्याने आपली मानसिकता ढासळल्याचा आरोप करीत आपल्या पदाचा राजीनामाच जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह इतर अधिकाèयांना पाठविल्याने मग्रारोहयो कर्मचारीवर्गात खळबळ माजली आहे.
दरम्यान उपजिल्हाधिकारी(रोहयो)निलेश कोरडे यांना यासंदर्भात विचारणा केल्यावर त्यांनी सांगितले की शासनाचे जे धोरण व नियम आहेत,त्यानुसारच मनरेगाची कामे करावयाची आहेत.त्यांसदर्भातल्या सुचना त्यांना दिल्या आणि शासनचाचे धोरण आहे की जे नियमबाह्य कामे झाले असतील तर त्याची वसुली संबधिताकडूनच करण्यात यावे,त्यामुळे आपण त्यांना त्याची माहिती दिली धमकी नव्हे.तर  त्या सहाय्यक कार्यक्रम अधिकारीला कार्यालयात बोलावून त्याला राजीनामा हे कारण नाही असे सांगून त्याला राजीनामा परत घेण्यासही म्हटल्याचे सांगितले.
सविस्तर असे की,मनरेगा सहाय्यक कार्यक्रम अधिकारी चौव्हान हे आमगाव पंचायत समितीमध्ये कार्यरत असून पंचायत समितीतंर्गत येत असलेल्या तिगांव व ठाणा येथील मागणीनुसार तसेच मनरेगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या तोंडीआदेशानुसार कामांना सुरवात केली.शासनपरिपत्रकानुसार मनरेगाचे काम सुरु करण्यासंदर्भात वेगवेगळे निर्णय आहेत.त्यानुसार आणि १३ फेबुवारी २०१९ च्या पत्रानुसार रस्ताची कामे ही पालकमंत्री शेत पांदन रस्ते अंतर्गत करण्यात यावे,नहर दुरुस्ती,तलावातील गाळ काढणे,नालासरळीकरण करणे आदी कामे वगळण्याचे निर्देश देण्यात आले.तर जलयुक्त शिवारमध्ये निवडलेल्या गावामध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत कामे तत्काळ सुरु करण्याचे निर्देश देण्यात आल्याने ग्रामपंचायत बोथली व तिगाव येथे तलावातील गाळ काढण्याचे काम तर ठाणा येथे रस्ता खडीकरणाचे काम सुरु करण्यात आले.या कामावार १३ फेबुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयातील रोहयो विभागाचे उपजिल्हाधिकारी यांनी भेट देऊन हजेरीपत्रक रजिष्टरची चौकशी केली.तसेच सदर कामे माझी परवानगी न घेता कसे काय सुरु केले तसेच रस्ता खडीकरणाचे काम आपल्या मर्जीने हेतुपरस्पर करीत असल्याचे बोलून खर्च वसुल करण्याचा धमकीवजा इशारा दिल्याचे चव्हाण यांनी आपल्या राजीनामापत्रात म्हटले आहे.तर दुसरीकडे ग्रामपंचायत व लोकप्रतिनिधी काम सुरु करण्यात यावे यासाठी दबाव घालत आहेत.कत्रांटी पदावर काम करीत असताना सर्वांचे बोलणे एैकुण घेणे वेगळे,तर मिळणारे मानधन अल्प असल्याने आणि अधिकारी अशाप्रकारची धमकी देत असल्याने आपली मानसिकता काम करण्याची राहिली नसल्याने राजीनामा देत असल्याचे म्हटले आहे.