26.9 C
Gondiā
Thursday, August 13, 2026
Home विदर्भ ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे धरणे आंदोलन सुरु

ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे धरणे आंदोलन सुरु

0
39

गोंदिया,दि.०६ः-महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी महासंघ(आयटक)च्या नेतृत्वात गोंदिया जिल्हा परिषदेसमोर ग्रामपंचायत कर्मचाèयांच्या विविध मागण्यांना घेऊन (दि.०५)पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू  करण्यात आले आहे.या आंदोलनात महासंघाचे राज्य संघटक मिलिंद गणविर,जिल्हाध्यक्ष कयुम शेख यांच्या नेतृत्वात सुरू  असून आयटकचे जिल्हा अध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांनी आंदोलनाला पांठीबा जाहिर केला आहे.मंजुर रिक्तपदाचे १० टक्के आरक्षणांतर्गत जिल्हा परिषद सेवेत पात्र कर्मचाèयांची वर्ग ३ व ४ च्या पदावर भरती करण्यात यावी.ऑनलाईन वेतन प्रकिया पुर्ण करुन वेतन देण्यात यावे.१०० टक्के वेतनासाठी ९० टक्के करवसुलीची अट रद्द करण्यात यावी.या आंदोलनात जिल्ह्यातील मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचारी सहभागी झालेले आहेत.

blank