जगातिक ग्राहक दिनानिमित्त विशेष कार्यशाळा

0
9
  • ११ ते १५ मार्च दरम्यान विविध विषयांवर मार्गदर्शन

वाशिम, दि. ०8 : जागतिक ग्राहक दिनानिमित्त जिल्हा ग्राहक मंचच्यावतीने ११ ते १५ मार्च २०१९ या कालावधीत विशेष कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वाशिम येथील तहसील कार्यालयामागील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथे सायंकाळी ४ ते ५ वा. या वेळेत हे शिबीर होणार आहे.

विशेष कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरामध्ये ग्राहकांचे हक्क व अधिकार, ग्राहकांच्या समस्या व उपाय, ग्राहक संरक्षण अधिनियम व संबंधित तरतुदीची माहिती, तक्रार कशी व कुठे दाखल करावयाची व त्याचे स्वरूप, तक्रार अर्ज, मागणी व प्रक्रियेमधील अडचणी, तक्रारकर्ता व विरोधी पक्ष यांच्या तक्रार व बचावाची मांडणीमधील अडचणी, आदेशाची दिवाणी व फौजदारी स्वरुपात अंमलबजावणी आदी विषयांवर ग्राहक मंचाचे अध्यक्ष, सदस्य तसेच ग्राहक परिषदेचे अधिकारी व फेसकॉमचे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. तरी नागरिकांनी या विशेष कार्यशाळा व मार्गदर्शन शिबिरास उपस्थित रहावे, असे आवाहन वाशिम जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचमार्फत करण्यात आले आहे.