कुटूबांच्या प्रगतीमध्ये महिलांचे योगदान-सुरेखा साहू

0
11

तिरोडा,दि.13: जागतीक महिला दिनाचे औचित्य साधून अदानी फाऊंडेशन तिरोडाद्वारा अदानी पॉवर परिसरात बॅलेन्स फॉर बेटर या विचारातून महिला मेळाव्याचे आयोजन सौ. सुरेखा साहू यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या कार्यक़्रमाला प्रमुख अतिथी म्हणून रुपा चटर्जी, स्वाती शंगठोकर, वर्षा पाठक व धनलक्ष्मी मिश्रा या उपस्थित होत्या. तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून धनाचाल आवळा उत्पादक कंपनीच्या संचालिका हर्षदा वाहाणे, योगी कामधेनू उत्पादन कंपनीच्या प्रिती टेंभरे, , वसंतराव नाईक संस्था नागपूरच्या प्रा. माया वंजारे व शेतकरी उत्पादक कंपनी सिहोराच्या माया काटनकर उपस्थित होत्या. मार्गदर्शकांनी आपआपल्या क्षेत्रातील अनुभव कथन करुन महिलांनी जर संघटीत येवून एखादा व्यवसाय सुरु केला तर त्यामधून आर्थिक फायदा कसा होवू शकतो याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक अदानी फाऊंडेशनचे प्रमुख नितीन शिराळकर यांनी केले.
अदानी पॉवर तिरोड्याचे व्यवस्थापक सी.पी.साहू यांनी महिला मेळावा कार्यक्रमाला भेट देवून महिलांची स्वयरोजगाराकडे वळावे अदानी फाऊंडेशन तुमच्या पाठिशी आहे अशी ग्वाही दिली.
कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व महिला सरपंच, सुपोषण कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर काम करणाèया संगीनी ग्रामपंचायतीच्या महिला सदस्या, बचत गटाच्या महिला अशा सर्व ३०० महिला उपस्थित होत्या. कार्यक़्रमाच्या यशस्वितेसाठी सुपोषण कार्यक्रमाचे स्वप्नील वाहाणे यांच्यासह अदानी फाऊंडेशनच्या सर्व कर्मचाèयांनी परिश्रम घेतले. संचालन प्रिती उके तर आभार अदानी फाऊंडेशनच्या दिपा बेद्रे यांनी मानले.