ढिवर मच्छिमार समाजाचा आभार मेळावा उत्साहात

0
23

सडक अर्जुनी,दि.17ः- महाराष्ट्र राज्य मच्छिमार संघर्ष कृती समिती तथा विदर्भ विभागीय मच्छिमार सहकारी संघ, र्मया नागपूर यांच्या वतीने भोई, ढिवर मच्छिमारांच्या आभार मेळावा कार्यक्रम तेजस्विनी लॉन, सडक अर्जुनी येथे उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले होते..मुख्य अतिथी म्हणून आमदार डॉ.परिणय फुके, आ. बाळाभाऊ काशिवार, आ. संजय पुराम, बाळाभाऊ अंजनकर, शेषराव गिर्‍हेपुंजे, सविता पुराम, जि.प.सदस्य रचनाताई गहाने, नगराध्यक्ष भंडारा सुनील मेंढे, प्रकाश लोणारे, सदाशिव वलथरे, दशरथजी केवट, अशोकजी बावणे, दादाराव आळणे, नेत्रराम निषाद, सावळाराम मारबते, सुखदेव मेश्राम, सेवक मोहनकर, दिलीप मेश्राम, अमोल बावणे, रमेश खेडकर, वासुदेव सुरजूशे, दिलीप चौधरी, अभिजित डोंगरे व इतर मान्यवर उपस्थित होते.
तलावाचा ठेका देतांना महसूल कसा मिळवायचा यावर भर देण्यात आला होता. परिणामी बहुतांश मासेमारी करणारे या जीवघेण्या स्पधेर्तून बाद झाले. त्यांच्या जागेवर खाजगी उद्योजकांनी मक्तेदारी निर्माण केली होती. त्या मासेमारी करणार्‍यांवर उपासमारीचे संकट आले होते. अशा स्थितीत सहकार भारती अंतर्गत मच्छिमार सहकारी संस्थाच्या आमच्या शिष्टमंडळाने आ. डॉ. परिणय फुके यांची भेट घेऊन वरील समस्या त्यांच्या निदर्शनात आणून दिल्या. सदर समस्या मार्गी लावण्याकरिता आ. फुके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे मच्छिमार समाजाच्या समस्या मार्गी लावून त्या सोडविल्याबद्दल संस्थेच्या वतिने आभार मानलेमुख्यमंत्री फडणवीस यांनी दूरगामी लाभदायक असा धाडसी निर्णय घेत महाराष्ट्रातील मच्छिमार संस्थांना ५00 हेक्टरपयर्ंतच्या तलावाचा ठेका अगदी मोफत देण्याची घोषणा केली. त्यामुळे विनाशुल्क तलाव मिळणार असल्याने याचा लाभ राज्यातील सुमारे २0 लाख मासेमार्‍यानां होईल असे आ.फुके यांनी सांगितले.यावेळी हजारोच्या संख्येनी उपस्थित भोई व ढिवर मच्छिमार समाज बांधवांनी मुख्यमंत्री व आमदार डॉ.परिणय फुके यांचे आभार मानले.