गोंदियाचे नवे जिल्हाधिकारी विजय सुर्यवंशी

0
17

मुंबई- राज्यसरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने आज काही महत्वाच्या आयएएस अधिकायाच्या बदल्या केल्या त्यामध्ये गोंदियाचे जिल्हाधिकारी डाॅ.अमित सैनी यांची कोल्हापूर जिल्हाधिकारी म्हणून बदली केली.तर कोल्हापूरचे जिल्हाधिकारी आर.आर.माने यांची पुणे येथील क्रीडासंचालनालयाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.त्याचप्रमाणे वाशीमचे जिल्हाधिकारी आर.जी.कुलकर्णी यांची बदली मुबंईच्या मानव विकास अधिकार विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली.पुनर्बांधणी आणि दुरुस्ती विभागाचे मुख्य अधिकारी रामास्वामी यांची बदली मुबंईतच विक्रीकर अति.आयुक्त पदी.पालघर जिल्हा परिषदेचे सीईओ व्ही.एन.सुर्यवंशी यांची गोंदिया जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.ते 2006 च्या बँचचे आएएस अधिकारी आहेत.सुभाष लाखे यांची मुबंई येथे मुख्य अधिकारी पुनबांधणी व दुरुस्ती विभागात करण्यात आली आहे.