गोंदिया जिल्हा रुग्णालयाच्या 58 पदांना मुदतवाढ

0
15

गोंदिया-राज्यसरकारच्या आरोग्य विभागाने जिल्ह्यातील आरोग्य सेवा खंडीत होऊ नये तसेच रुग्णांना सेवा मिळावी या हेतून गोंदियातील कुवरतिलकसिंह जिल्हा सामान्य रुग्णालयातील अस्थायी 58 पदांना आज मुदतवाढ देण्यासंदभार्त निणर्य घेतला आहे.त्यामुळे 1 मार्च 14 ते 29 फेबुवारी 2016 पर्यंत या पदांना मुदतवाढ देण्यात येत असल्याचे पत्र जिल्हा सामान्य रुग्णालय व जिल्हाप्रशासनाला देण्यात आले आहे.या पदामध्ये चमर्रोग वैद्यकिय अधिकारी,वैद्यकिय अधिकारी रक्तसंक्रमणसह ,परिसेविका,अधिपरिचारिका वर्ग 3,प्रयोगशाळा तंत्रज्ञ,रक्तपेढी,तंत्रज्ञ,औषध निर्माता,वैद्यकिय अधिकारी वर्ग 2,वरिष्ठ लिपिक,कनिष्ट लिपिक,उदवाहन चालक,क्ष किरण तंत्रज्ञ आदी पदांचा समावेश आहे.जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ.रवी धकाते यांनी यासंदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला होता.