प्रा. संध्या येलेकर पुरस्काराने सन्मानित

0
33

गडचिरोली,दि.28ः- लॉयन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत चे व्दितीय प्रांतीय अधिवेशन सर्मपण एम्प्रेस हॉल नागपूर येथे पार पडले. या अधिवेशनात लॉयन्स क्लब गडचिरोलीच्या सचिव प्रा. संध्या शेषराव येलेकर यांना लॉयन्स क्लब इंटरनॅशनल प्रांत ३२३४ एच-१ चा उत्कृष्ट सचिवाचा पुरस्कार प्राप्त झाला.
सदर पुरस्कार आंतरराष्ट्रीय निदेशक एमजेएफ डॉ. नवलकिशोर मालू यांच्या हस्ते प्रा. संध्या येलेकर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी प्रांतपाल सुनील होरा, मल्टीपल कॉन्सिलचे चेअरमन संदिप मालू, प्रथम उपप्रांतपाल जिवन निर्वाण, व्दितीय उपप्रांतपाल सुनील खंडेलवाल उपस्थित होते.
याप्रसंगी प्रांतपाल होरा यांनी प्रा. संध्या येलेकर यांच्या कार्याची प्रशंसा करीत त्या आव्हानात्मक व्यक्तीमत्वाच्या धनी असल्याचे मत व्यक्त केले. कार्यक्रमाला लॉयन्स क्लब गडचिरोलीच्या अध्यक्षा स्मिता लडके, कोषाध्यक्ष सुचिता कामडी, इजि. सुरेश लडके, प्रा. देवानंद कामडी, शेषराव येलेकर तसेच विदर्भातील लॉयन्स सदस्य उपस्थित होते.