यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ २४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

0
67

वाशिम, दि. २८ : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता दाखल उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी, २८ मार्च २०१९ रोजी ७ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. त्यामुळे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये २४ जणांची उमेदवारी कायम राहिली आहे. २६ मार्च रोजी झालेल्या छाननीमध्ये एकूण ३१ अर्ज वैध ठरविण्यात आले होते.

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणूक रिंगणात असलेल्या उमेदवारांमध्ये अरुण सखाराम किनवटकर (बहुजन समाज पार्टी), ठाकरे माणिकराव गोविंदराव (इंडियन नॅशनल काँग्रेस), भावना पुंडलिकराव गवळी (शिवसेना), उत्तम भगाजी कांबळे (प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी), पुरुषोत्तम डोमाजी भजगवरे (राष्ट्रीय बहुजन काँग्रेस पार्टी), पुंडलिक बळीराम राठोड (सन्मान राजकीय पक्ष), प्रवीण गोविंद पवार (वंचित बहुजन आघाडी), रवी संपतराव जाधव (बहुजन मुक्ती पार्टी), राजेश भाऊरावजी राऊत (गोंडवाना गणतंत्र पार्टी), वैशाली सुधाकर येडे (प्रहर जनशक्ती पक्ष), अनिल जयराम राठोड (अपक्ष), अंकित मोहन चांडक (अपक्ष), नरेश महादेवराव  गुघाणे (अपक्ष), नूर आली महेबूब अली शाह (अपक्ष), परशराम भावसिंग आडे (अपक्ष), पवार रमेश गोरसिंग (अपक्ष), डॉ. राजीव अग्रवाल (अपक्ष), रामराव सवाई पवार (अपक्ष), शहेजाद समिऊल्ला खान (अपक्ष), शेख जावेद शेख मुश्ताक (अपक्ष), समीर अरुणराव देशपांडे, सलीम शाह सुलेमान शाह (अपक्ष), सुनील नटराजन नायर (अपक्ष), सिंपल राजकुमार राठोड (अपक्ष) यांचा समावेश आहे.