ओबीसीच्या हक्कासाठी संसदेत आवाज उठविणार-डॉ. विजया नंदुरकर

0
19

गोंदिया/भंडारा,दि.02: भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील बहुजन समाज पक्षात व समाजवादी पार्टीच्या उमेदवार डॉ. विजया राजेश नंदुरकर (ठाकरे) यांनी आपल्या प्रचारा दरम्यान तालुक्यातील आसगाव, पवनी, विरली, चौघान, गोंदिया तालुक्यातील कुडवा, दासगाव, पांढराबोडी, परिसरात मतदारांशी संवाद साधतांना आपण ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी संसदेत आवाज उठविणार असल्याचे सांगत ओबीसींची जनगणना व्हावी हाच आपला पहिला अqजडा राहणार असल्याचे विचार व्यक्त केले.
नुक्कड सभा व कार्यकत्र्यांच्या भेटीच्या माध्यमातून डॉ. विजया नंदूरकर या प्रचारात मग्न झाल्या असून निवडणूक रिंगणात असलेल्या १४ उमेदवारांपैकी त्या एकमेव महिला उमेदवार आहेत. लोकसभा मतदार संघात कुणी तरी येईल आणि बदल घडवेल ही वाट बघण्यापेक्षा स्वतच परिवर्तनात सहभागी व्हावे आणि आपल्या मुलीला, बहिणीला, सुनेला व मैत्रिणीला म्हणून एक संधी या निवडणुकीच्या माध्यमातून संसदेत जाण्याची दयावी असे आवाहन ही केले. त्यांनी ओबीसी जनगणना, १०० टक्के स्कॉलरशिप, स्वामीनाथन आयोग, सुसज्य आरोग्य सेवा, विद्याथ्र्यांसाठी सुसज्ज अभ्यासिका, खासगी क्षेत्रात एससी, एसटी, ओबीसींना आरक्षण, स्थानिक उद्योगात ८० टक्के युवकांना रोजगार आणि क्रिमिलीअरची अट रद्द करण्यात यावी अशा अनेक मागण्यांना घेवून आपण या निवडणुकीच्या रिंगणात आहोत. कोट्यावधी संपत्ती असलेल्या उमेदवाराच्या तुलनेत आपण मागास असून बाबासाहेबांच्या विचारांना घरा-घरापर्यंत पोहोचविण्यासाठी मतदानाच्या माध्यमातून संधी द्यावे असे आवाहन केले. यावेळी त्यांच्यासोबत डॉ. राजेश नंदुरकर, पंकज वासनिक, मोहसीन खान, सुनील भरणे आदि पदाधिकारी व महिला उपस्थित होत्या.