देसाईगंज येथे फिरत्या न्यायालयाचे उद््घाटन

0
5

देसाईगंज,दि.02ः-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोली तथा तालुका विधी सेवा समिती देसाईगंज यांच्या संयुक्त विद्यमाने फिरत्या न्यायालयाचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शर्मा यांनी हिरवी झेंडी दाखवून उद््घाटन केले.प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणचे न्यायाधीश कांबळे, ज्येष्ठ विधीतज्ञ अँड. संजय गुरू, अँड. वारजुरकर, अँड. लॉंगमार्च खोब्रागडे, अँड. मंगेश शेंडे, अँड. नेहा इलमुलवार, अधीक्षक देशमुख, तरपे, न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
न्याय आपल्या दारी या संकल्पनेतून फिरत्या न्यायालयाचे फार मोठे योगदान आहे. वाहनामध्ये फिरत्या न्यायालयाचे न्यायाधीश मशाखेत्री काम पाहणार आहेत. त्यात पॅनल अँड. दत्तू पिल्लारे हे आहेत. तसेच समाजसेवक कांडलकर हे काम पाहणार आहेत. त्यांच्यासोबत न्यायालयीन कर्मचारी असून सदर वाहन गावोगावी जावून न्यायनिवाडा करून प्रकरण आपसात तडजोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. या न्यायालयाची सुरूवात कोंढाळा येथे असून ग्रामीण जनतेने फिरत्या लोकअदालतीचा लाभ घेवून आपली प्रकरणे समोपचाराने मिटवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.