भूसंपादन कायद्याला विरोधासाठी विरोध नको- केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू

0
12

नागपूर- ‘भूसंपादन कायदा शेतकऱ्यांच्या हिताचा आहे. या कायद्यात शेतकऱ्यांना चौपट नुकसान भरपाई देण्याची तरतूद असून २० वर्षांपर्यंत मासिक दोन हजार शेतकरी कुटुंबाला देण्याचीही तरतूद आहे. त्यामुळे या कायद्याला विरोध करू नका, असे आवाहन केंद्रीय नगरविकासमंत्री व्यंकय्या नायडू यांनी शनिवारी केले.

नायडू म्हणाले, रामराज्य ही धर्माधिष्ठित नसून आदर्श राज्याची कल्पना आहे. प्रभू राम एक आदर्श पुत्र, बंधू, पिता व सखा होता. रामाचे राज्य आदर्श होते. उत्तम प्रशासकीय व्यवस्था रामराज्यात होती. म्हणून महात्मा गांधींनीही रामराज्याचा पुरस्कार केला होता, असे ते म्हणाले. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी पंतप्रधान तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र लिहून संपुआ सरकारने पारित केलेला कायदाच कायम ठेवण्याचे आवाहन केले आहे, याकडे नायडू यांचे लक्ष वेधले असता, केवळ विरोधासाठी विरोध नको, असे ते म्हणाले. आम्ही नेहमीच सहमतीचे राजकारण केले आहे. आता काँग्रेसने राजकीय विरोध करू नये. जून २०१४ मध्ये नितीन गडकरींनी भू-संपादन कायद्यावर बोलावलेल्या बैठकीत २८ राज्यांनी दुरुस्ती करण्यास मान्यता
दिली होती.