आमगावच्या वार्ड क्र.४ मध्ये पाण्यासाठी भटकंती

0
11

आमगाव(पराग कटरे)दि.20ः- एप्रिल महिन्यापासून उन्हाचा तडाखा बसला असून पारा ४२ अंशावर चढला आहे अशातच आमगाव नगर परिषद अंतर्गत वार्ड क्रं.४ मधील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. बोरवेल ला पाणी नाही,विहिरी आटलेल्या त्यामुळे वार्डातील नागरिक भीषण पाणी टंचाईला तोंड देत आहेत.ही पाणी टंचाई दूर व्हावी,यासाठी या वार्डातील अग्रवाल यांनी स्वतः पुढाकार घेऊन लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे पाठपुरावाकेला.मात्र उपयोग झाला नाही. प्रचार माध्यमाच्या माध्यमातून तरी नगर परिषद अधिकारी यांना जाग येईल या करिता qपकी अग्रवाल यांनी हेरीटेज हॉटेल येथे पत्र परिषदेच्या माध्यमातून वार्डातील पाणी टंचाईचे सविस्तर माहिती दिली.आमगाव तालु्नयातील भवभूती नगर गणेशपुर वार्ड क्रं.४ मध्ये भिषण पाणी टंचाईमुळे या वार्डातील नागरिकांना एक दीड किलोमीटर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.या भागात दरवर्षी उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असते.मागील कित्येक वर्षापासून भीषण पाणी टंचाईला दूर व्हावी,यासाठी अनेकदा तेथील वार्डातीलरहिवासीयांनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला.मात्र उपयोग झाला नाही. त्यामुळेच वार्डातील समस्याग्रस्त लोकांनी दोन महिन्यांपूर्वी तहसीलदारांना निवेदन दिले होते. परंतु निवेदनाची दखल घेण्यात आली नाही.अधिकारी आचार संहितेचे कारण दाखवून वेळ काढत आहेत जेव्हा पाणीटंचाई निवारणाकरीता आचारसहिंतेला शिथिल करण्यात आलेले आहे.