बुद्ध पोर्णिमेला होणार वन्यप्राण्यांची प्रगणना

0
12
file photo

गोंदिया,दि.20 : राज्यातील सर्वच व्याघ्र प्रकल्प आणि अभयारण्यामध्ये १८ मे रोजी बुद्ध पोर्णिमेनिमित्त पाणस्थळावर वन्यप्राण्यांची प्रगणना करण्यात येणार आहे. महिला स्वयं सेविकांसाठी विशेष व्यवस्था करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. या प्रगणनेला गेल्या वर्षीपासून निसर्ग अनुभव असे संबोधण्यात येते. देशभरातील निसर्गप्रेमी यात सहभागी होत असतात हे विशेष.
केंद्रीय पर्यावरण व वनखात्याने दिलेल्या निर्देशानुसार २0१0 व २0१४ मध्ये देशभर व्याघ्र प्रगणना करण्यात आली आहे. वाघांच्या संख्येचे अंदाज घेण्यासाठी राष्ट्रीयस्तरावर निश्‍चीत केलेल्या पध्दतींचा वापर होतो. दर चार वर्षांनी होणार्‍या अखिल भारतीय व्याघ्र प्रगणनेत वाघासोबत त्याच्या भक्ष्याचा अंदाजसुध्दा घेण्यात येतो. त्यात संख्या निश्‍चीत न होता फक्त भुप्रदेशनिहाय प्राण्यांचे घनत्वाची माहिती मिळते. वन्यजीव संरक्षित क्षेत्र व राखीव क्षेत्रात वन्यप्राण्यांचा संख्येचा अंदाज आणि नागरिकांना जंगलातील रात्रीचा निसर्ग अनुभव घेता यावा यासाठी बुध्दपोर्णिमेला पाणवठय़ावरील प्रगणना करण्यात येत असते. ती यंदा ही १८ मे रोजी रात्री मचाणावर बसून केली जाणार आहे. त्यासाठी सुरक्षित क्षेत्रामध्ये विद्यमान परिस्थीतीच्या आधारे संभावित पाणस्थळांची संख्या निश्‍चीत करणे, स्वयंसेवींची नोंदणी करणे, पाणस्थळावर स्थायी मचाण उभारणे, स्थायी मचाणावर महिला स्वयंसेवकांची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात येणार आहे. प्रत्येक मचाणावर एक स्वयंसेवी खासगी व्यक्ती व एक विभागाचा प्रतिनिधी असे दोघेच असणार आहेत. १८ वर्षाखालील व्यक्तीला प्रगणनेत सहभागी होण्यास मज्जाव करण्यात आला आहे. निसर्ग अनुभवाच्या दिवशी प्रगणकांना त्यांनी नेमून दिलेल्या मचाणापयर्ंत पोहचविण्याची व निसर्ग अनुभवाचा काळ संपल्यानंतर परत आणण्यांची व्यवस्था स्थानिक पातळीवर करण्यात येणार आहे