महाराष्ट्र दिन पूर्व तयारीचा आढावा

0
20

वाशिम, दि. २२ : महाराष्ट्र राज्य स्थापनेचा एकोणसाठावा वर्धापन दिन १ मे २०१९ रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने पोलीस कवायत मैदान येथे आयोजित केल्या जाणाऱ्या मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आज निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे व अपर पोलीस अधीक्षक विजयकुमार चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठक झाली.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मोहुर्ले, महावितरणचे अधीक्षक अभियंता विनोद बेथारिया, जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक सुनंदा बजाज, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री. लुंगे, राखीव पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवासी उपजिल्हाधिकारी श्री. हिंगे म्हणाले, महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मुख्य ध्वजारोहण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सोपविण्यात आलेली जबाबदारी सर्व संबंधित यंत्रणांनी नियोजित वेळेत पूर्ण करावी. मुख्य शासकीय ध्वजारोहण सकाळी ८ वाजता होणार आहे. त्यामुळे सकाळी ७.१५ वाजलेनंतर व सकाळी ९ वाजण्यापूर्वी इतर कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था यांनी ध्वजारोहणचा कार्यक्रम आयोजित करू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ७.१५ वा. पूर्वी किंवा सकाळी ९ वा. नंतर आयोजित करावा, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.