अतिमुकाअ हासमीच्या कक्षाला आग कशी लागली?

0
64

गोंदिया,दि.23: जिल्हा परिषदेच्या मुख्य इमारतीच्या पहिल्या माळ्यावरील अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हासमी यांच्या कक्षाला आग लागून साहित्याची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. ही आग कशी लागली,कुणाच्या चुकीमुळे लागली असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोबतच ज्या कक्षात आग लागली त्या आगीला बाहेरुन ऑक्सीजनचा पुरवठा न झाल्यामुळे आगीने उग्र रुप धारण केले नाही. अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षासह जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आगीच्या विळख्यात आली असती. लोकसभा निवडणुकीची धामधुम सुरु असतानाच ९ एप्रिल रोजी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाला रात्री आग लागली. १० एप्रिल रोजी सकाळी जेव्हा कर्मचारी कार्यालयात पोहोचले आणि कक्ष उघडायला गेले तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. घटनेच्या दिवशी अति मुकाअ यांच्या कक्षातील सर्व कर्मचारी हे सायकांळी ६ वाजेच्या आत निघून गेले होते. मात्र अतिरिक्त मुकाअ हासमी आपल्या कक्षात बसून होते,असे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते आग लागली त्या दिवशी कार्यालयात बसले होते,परंतु जेव्हा यांसदर्भात त्यांना बेरार टाईम्स प्रतिनिधींने भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता आपण कार्यालयात हजरच नव्हतो आपणास काहीही माहित नाही असे सांगितले.त्या कक्षातून रात्री उशिरा निघणारे ते एकमेव होते. तरीही त्यांनी आग कधी लागली आणि ज्या दिवशी लागली त्या दिवशी आपण कार्यालयात हजर नव्हतो असे बोलून कार्यालयात हजर असतानाही खोटे का बोलले हा ही एक प्रश्न उपस्थित झालेला आहे.

विशेष म्हणजे या कक्षाची रंगरंगोटी व दुरुस्ती एक दिड वर्षापुर्वीच करण्यात आल्याचे बोलले जाते. जिल्हा परिषदेत अधिकारी व पदाधिकारी यांच्या कक्षाचे नुतनीकरण अधिकारी व पदाधिकारी बदलताच नेहमी करण्यात येते. त्याकरिता आपल्या खास कंत्राटदारांना अधिकारी हे काम देण्यासाठी आटापिटा करतात. परंतु कक्षाची रंगरंगोटी, पीओपी व त्या वापरले जाणारे विद्युत साहित्य या सर्वांची गुणवत्ता योग्य आहे की नाही हे कुणीच तपासत नसल्याने निकृष्ठ दर्जाचे साहित्य ही वापरले जात असल्यानेच अशा आगीच्या घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. अतिरिक्त मुकाअ यांच्या कक्षाला लागलेल्या आगीमुळे या सर्व विद्युत उपकरणांच्या साहित्याच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे. ही आग लागण्यामागचे कारण काय? हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यातच या लागलेल्या आगीची दखल मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घेत सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे वृत्त आहे. या आगीमुळे एक मोठी दुर्घटना होता होता टळली असे असले तरी जिल्हा परिषदेतील अग्नीशामन यंत्र बरोबर आहेत की नाही तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये आग लागल्यास जी पाईप लाईनची व्यवस्था असायला हवी ती सुद्धा या ठिकाणी नाही. प्रशासकीय उमारत होवून १५ वर्षाचा कार्यकाळ लोटला मात्र लिफ्टची व्यवस्था नाही. आगीच्या वेळी ही कारणे नुकसानदायक ठरणारी आहेत.

अतिरिक्त मुकाअ यांच्या कक्षाला आग लागल्यानंतर लगेच एका कंत्राटदाराला बोलावून दुरुस्ती व रंगरगोटी करण्यासंदर्भात निर्देश देण्यात आले होते. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी घटनास्थळीची पाहणी करुन आधी चौकशी होईल नंतरच काम होईल असे सांगितले.पुर्ण प्रशासकीय इमारतीतील पोर्चचे विद्युतीकरण व पीओपीचे काम निघाले होते.एक पीओपीचे काम 15 लाख रुपयाचे होते.त्यात एलईडी लावण्याचे काम 12 लाख रुपयाचे होते त्याचे ईटेंडर निघाले होते.तो टेंडर भरणायाला बोलावून चमकवण्यात आले होते.  त्या कंत्राटदारालाही नंतर धमकावत हे तु काम करायच नाही आम्हाला आमच्या एका कंत्राटदाराला द्यायचे आहे अशी दमदाटी ही करण्यात आल्याचे वृत्त आहे. अधिकाèयांचे या घटनेमुळे गुणवत्तेकडे नव्हे तर भ्रष्टाचाराकडेच अधिक लक्ष आहे की काय? असे वाटू लागले आहे. या आगीच्या घटनेमुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गेल्या वर्षभरात आणि सध्या सुरु असलेल्या सर्व अधिकारी व पदाधिकारी यांच्या कार्यालयात करण्यात आलेल्या रंगरंगोटी, पीओपी व विद्युती करणात वापरलेल्या साहित्याच्या चौकशीसाठी समिती नेमण्याची गरज आहे. या चौकशीत ज्या कंत्राटदाराने गुणवत्तापूर्ण साहित्याचा वापर केला नसेल अशा कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याचे काम मुख्य कार्यकारी अधिकारी व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी पारदर्शक प्रशासनात करतील काय याकडे लक्ष लागले आहे.