सावली तालुका आदिवासी आघाड़ीच्यावतीने कॉंग्रेस नेत्‍यांच्‍या विरोधात निदर्शने

0
20

सावली,दि.25ः- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील इन्फन्ट जीजस शाळेतील आदीवासी विद्यार्थ्यांनीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी ब्रम्हपुरी विधानसभेचे आमदार विजय वडेट्टीवार, काँग्रेस जिल्हा अध्यक्ष सुभाष धोटे व काँग्रेस उमेदवार बाळू धानोरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदविण्यासाठी आज सावली तहसिल कार्यालयावर जनाक्राेश मोर्चा काढून काँग्रेस नेत्यांच्या विरोधात सावली तालुका आदिवासी आघाडीच्यावतीने निदर्शेने करण्यात आली.या आंदोलनात तालुक्यातील आदिवासी महिला पुरुष मोठ्या संख्येने भर उन्हात सहभागी झाले होते.काँग्रेस नेत्यांचे वक्तव्य म्हणजे आदिवासी समाजाचा जाणूनबुजून केलेला अपमान असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला आहे. मोर्चेकरांनी तहसिलदारांना निवेदन देत कडक कारवाईची मागणी केली.