मानोरामध्ये 9 घरांना भीषण आग

0
17

वाशिम,दि.25- जिल्ह्यातील मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील पेटविलेल्या धुर्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांना भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.माहितीनुसार, सोमठाणा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या भायजी नगर येथे  खरीप हंगामापूर्वी शेत मशागतीची कामे करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी शेतातील धुरे पेटवून दिले. त्याचा मोठा भडका होऊन परिसरात एकमेकांना लागून असलेली घरे आगीच्या कवेत सापडली. त्यात घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांनी ही आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न केला. यादरम्यान दिग्रस, मंगरूळपीर, कारंजा येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांमध्ये देवानंद शामराव वाघमारे, गजानन चंपत सोनोने, अरूण सुखदेव पखमोडे, अरूण विश्वनाथ कांबळे, गुलाब मोरकर, सुरेखा गजानन सोनोने, महादेव बापुराव कुडबे, शामराव बिरम, मिसनकर, अशोक उत्तम कोल्हे आदिंच्या घरांचा समावेश आहे.