राष्ट्रवादीच्या आंदोलनाची दखल…… अखेर इटियाडोह कालव्याला पाणी

0
22

अर्जुनी मोरगाव,दि.29ः-जनतेच्या न्याय हक्कासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस सतत संघर्ष करीत आहे. त्याचीच दखल घेऊन इटियाडोह कालवा क्षेत्रातील गावात पाण्याचे दुर्भीक्ष बघता राष्ट्रवादी कॉंग्रेस, महिला सेल इतरांनी प्रशासनाला निवेदन देवून १ मेपर्यंत पाणी सोडण्यात यावे, अन्यथा घागर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा ईशारा दिला होता. याची गंभीर दखल जिल्हाधिकारी व बाघ इटियाडोहचे कार्यकारी अभियंत्यांनी घेतली. अखेर कालव्याला पाणी प्रवाहित झाल्याने जनतेने राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आभार मानले.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील इटियाडोह धरणाचे पाणी फक्त अर्जुनी पर्यंत उन्हाळी पिकासाठी देण्यात आले. उर्वरित कालवासिमेतील गावात पर्जन्यमान कमी झाल्याने तलाव, विहिरी, नलिका कोरड्या पडल्यात. तीव्र उन्हाच्या झळा असह्य होत असतजांना पाण्याचे दुर्भीक्ष जाणवलेत. परंतु, शासन व प्रशासन निंद्रावस्थेत असतांना याची दखल त्यांनी घेतली नसल्याने जनता त्रस्त झाली होती. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसनी याची दखल घेऊन प्रशासनाला जागे केलीस की, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी राखीव जलसाठा असतांना पाणी कसे सोडले नाही. राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष पंस सदस्या सुशीला हलमारे यांच्या नेतृत्वात अर्जुनी मोरगावचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना तसेच तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, जिप सदस्य किशोर तरोणे, विपल बरैया, उद्धव मेंहदले यांनी प्रशासनाला जागे केले. जिल्हाधिकारी व कार्यकारी अभियंता यांनी याची दखल घेऊन २५ मे रोजी इटियाडोह धरणाचे पाणी ईटखेडा परिसरात कालव्याला प्रवाहित झाले. जनावरांची तृष्णावृत्ती सोबत ताडगाव, बुधेवाडा, महालगाव, ईटखेडा, ईसापूर, खामखुर्रा, हेटी, मांडोखाल, टोला, कोरंभी, येगाव, जानवा, आसोली, वडेगाव रेल्वे, अरूणनगर, गौरनगर व इतर गावांतील नागरिकांनी राष्ट्रवादीचे आभार मानले.