मत्स्यव्यवसाय निर्मिती आणि मत्स्यशेतीसाठी पायाभुत सुविधा उपलब्ध

0
15

गडचिरोली,दि.02:- जिल्हयातील मत्स्यव्यसाय करणारे शेतकरी, व्यापारी व मत्स्यव्यवसाय करणेसाठीचे इच्छूक असणाऱ्या उमेदवारांना सुचित करण्यात येते की, केंद्र शासनाने मत्स्यव्यवसाय निर्मिती आणि मत्स्यशेतीसाठीच्या पायाभुत सुविधा उपलब्ध करुन देणे करीता केंद्र शासनाच्या कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने योजनांचे प्रस्ताव उद्योजक, मत्स्यशेतकरी यांचे मार्फत केंद्र शासनास सादर करण्यास कळविले आहे.

       या योजनेमध्ये फिशिंग बंदराची स्थापना, मासे उतरवण्यासाठीचे केंद्र, मॅरीकल्चर व प्रगत भुजलीय कल्चर ( सागरीय मत्स्यपालन , केज कल्चर) बर्फ कारखाना, कोल्ड स्टोरेज, मत्स्य वाहतूक कोल्ड चेन इनफ्रास्ट्रक्चर, मॉर्डन फिश मार्केट, ब्रुड बॅक, मत्स्यबिज निर्मिती केंद्र, जलाश्यांचा विकास, अधुनिक मत्स्यबिज निर्मिती केंद्र, फिशरीज ट्रेनिंग सेंटर, फिश प्रोसेसिंग युनिट, मत्स्य खाद्य निर्मिती मिल/प्लांट, केज कल्चर स्थापणा मोठया जलाश्यामध्ये, इ. नाविण्यपूर्ण प्रस्तावास पाठवू शकता. सबंधितांस केंद्रशासनाकडून ठरवून दिलेल्या बॅकांकडून आर्थिक सहाय्यक / कर्ज उपलब्ध्‍ करुन देण्यात येईल तसेच त्या करीता सबंधितांस प्रस्तावाच्या 20% रक्कमेचा हिस्सा त्याच्या जवळ असणे अनिवार्य आहे. लोन/कर्ज परतफेडीचा कालावधी किमान 5 वर्षे व कमाल 12 वर्षे असेल. प्रस्ताव सादर करण्यासाठीचा संपूर्ण पत्ता- संयुक्त सचिव (मत्स्यव्यवसाय) पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभाग, कृषी मिनेसरी आणि शेतकरी कल्याण भारत सरकार, कक्ष क्रमांक 221, कृषि भवन, नवी दिल्ली -110001