सामूहिक विवाहाच्या माध्यमातून समाजात एकतेची भावना-आ.गोपालदास अग्रवाल

0
9

गोंदिया,दि.02ः- सामूहिक विवाह फ्नत गरिबासाठी आहेत हा विचार चुकीचा असुन सामूहिक विवाहाच्या माध्यमातून समाजाचे सर्व घटक एका मंचावर येवून सामाजिक एकता निर्माण करतात.गोंदिया जिल्ह्यात असे सामूहिक विवाहाचे आयोजन करून राज्यात वैचारिक क्रांन्ती आणली आहे असे प्रतिपादन आमदार गोपालदास अग्रवाल यांनी गोंदिया जिल्हा कुणबी जनकल्याण संस्था खमारी तर्फे खमारी येथे आयोजित सामूहिक विवाह प्रसंगी केले. या सामूहिक विवाहात ८ जोडप्याचे शुभ मंगल करण्यात आले.या प्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे,माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर,सी.ए.राजेश चतुर, व्यसनमु्नती केन्द्राचे संचालक विजयभाऊ बहेकार,डॉ.शंशाक डोये,राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे राजाभाऊ इंगळे,मनोज मेंढे, बुधराम हत्तीमारे,व्ही.जे. रावते,गजेन्द्र फुंडे,संजय ओकटे,दुलीचंद बुद्धे,जगदीशभाऊ बहेकार,लिलाधर पाथोडे, मार्तेेकराव ब्राम्हणकर,कलावती चुटे,आशाताई तवाडे,कुणबी समाजाचे अध्यक्ष बुधराम चुटे, उपाध्यक्ष चिमनलाल मेंढे,सचिव आत्माराम कोरे,कोषाध्यक्ष राजु मेंढे,प्रसिद्धी प्रमुख गजानन तरोणे,संयोजक घनश्याम भाऊ मेंढे व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.आ.अग्रवाल पुढे म्हणाले की, राज्यात सामुहिक विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहन राशी १० हजारावरून आता २० हजार तर आंतरजातीय विवाहासाठी ५० हजाराऐवजी २ लाख रूपये निधी करण्यात आली आहे.सामूहिक विवाह समारंभ अतिथीच्या स्वागताने सुरू झाला व मंगलाष्टक व धार्मिक रितीरिवाजासह ८ जोडप्याचे मोठ्या उपस्थितीत शुभमंगल करण्यात आले.