प्रशासनाची भूमिका अन्यायकारक,तक्रारकर्त्याचे आरोप बिनबुडाचे : उपराडे

0
15
चौकशीनंतर न्यायालयात मानहानीचा दावा करणार पत्रपरिषदेत उपराडेंची माहीती
गोंदिया,दि.04 एप्रिलः-सालेकसा येथील सहकारी भात गिरणी या संस्थेवर ६३ हजार १५५.८० क्विंटल धानाची अफरातफर झाल्याची तक्रार एका खासगी राईसमिल मालकांने एका पत्रकार इसमाला सोबत घेऊन केली होती.त्याअनुषंगाने प्रशासनाने कोणतीही योग्य चौकशी न करता संस्थेच्या कार्यालयासह गोदामांना सील ठोकले. त्यामुळे प्रशासनाची ही भूमिका संस्थेची पत घालविणारी ठरणारी असून अन्यायकारक आहे. आजघडीला संस्थेत शिल्लक असलेला साठा व जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातील शिल्लक साठा यात साम्य असल्याने, संस्थेत कोणताही गैरप्रकार झाला नसल्याची माहिती, संस्थाध्यक्ष बाबुलाल उपराडे यांनी दिली.तसेच संपुर्ण चौकशीनंतर आपण झालेल्या बदनामीकरीता न्यायालयात मानहानीचा दावा करणार असल्याची माहिती २ मे रोजी स्थानिक हॉटेलमध्ये आयोजित पत्रपरिषदेत त्यांनी दिली.याप्रसंगी प्रामुख्याने आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा संघाचे अध्यक्ष शंकर मडावी, नागपूर विभागीय शासकीय आधारभूत धान खरेदी सहकारी संस्थांचा संघाचे सचिव रेखलाल टेंभरे, संचालक खेमराज लिल्हारे, परशुराम फुंडे, मनोज इळपाते, मनोज बोपचे आदी उपस्थित होते.
पत्रपरिषदेत पुढे बोलत उपराडे म्हणाले की, आपली संस्था ही शासकीय आधारभूत धान खरेदी करणारी सबएजेंट संस्था आहे. या संस्थेमध्ये ६३१५५.८० क्विंटल धानाची अफरातफर झाल्याची तक्रार जिल्हाधिकाèयांकडे करण्यात आली होती. या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कोणतीही पूर्वसूचना न देता २५ एप्रिल २०१९ रोजी प्रत्यक्ष गोडाऊनला भेट देऊन केवळ शिल्लक धानाची मोजणी करत नसल्याचे कारण पुढे करीत आमच्या संस्थाचे गोदाम सिल केले. या गोदामात शासकीय खरीदीतील शिल्लक असलेले ६११४०.२० क्विंटल धान आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी २६ एप्रिल २०१९ रोजी दिलेल्या पत्रानुसार व आजघडीला जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयात शिल्लक बाबतची नोंद घेतली असता संस्थाकडे आजघडीला ६११४०.२० क्विंटल धान शिल्लक असल्याचे स्पष्ट होत आहे. यावरुन या संस्थेमध्ये शासकीय धान खरेदीमध्ये कुठलेही धान अफरातफर झाली नसल्याचे स्पष्ट होत आहे. असे असतानाही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केवळ मोजणीचे कारण पुढे करणे, गोदाम सील करणे ही बाब संस्थेची बदनामी करणारी आहे. संस्थेमार्फत गत चार वर्षापासून पारदर्शकपणे कार्य सुरु असून जवळपास ३२०० शेतकèयांचे हित जोपासले जात आहे. परंतु एका आधार नसलेल्या तक्रारीनुसार प्रशासनाची ही भूमिका संस्थेसह परिसरातील शेतकèयांसाठी अन्यायकारक आहे. आपल्याकडे आलेल्या तक्रारीनुसार आपण योग्य कार्यवाही करावी, यासाठी संस्थेचे जिल्हा प्रशासनाला  सहकार्य राहील. संस्थेमार्फत केलेल्या धान खरेदीत कुठलाही गैरप्रकार आढळल्यास शिल्लक असलेल्या धानाची योग्य मोजमाप करावी. मात्र, या अनुषंगाने येणारा आर्थिक खर्च संस्था सहन करणार नसल्याचे ते म्हणाले. तसेच जिल्हा प्रशासनाने गोदाम सील केल्यामुळे आत साठवून ठेवलेल्या धानात घट आल्यास त्याची सर्वस्वी जबाबारी जिल्हा प्रशासनाची राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. एका खासगी क्षुल्लक तक्रारीवरुन जिल्हा प्रशासनाने घेतलेली टोकाची भूमिका ही शेतकèयांचे हित जोपासणाèया संस्थेसाठी अन्यायकारक असून याअनुषंगाने संस्थेची बदनामी झाल्याप्रकरणी संबंधित अधिकाèयांसह तक्रारकत्र्यांवरही मानहानीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.त्या खासगी राईसमिल मालकासोबतच काही पत्रकारांचा या तक्रार प्रकरणात सहभाग असल्याचा उल्लेख त्यांनी केल्यावर उपस्थित पत्रकारांनी विचारताच आपल्या सालेकसा-आमगाव तालुक्यातील नव्हे तर गोंदियातील पत्रकार असल्याचे म्हणत नामोल्लेख टाळला.
अनेक संघटना संस्थेच्या पाठीशी..
शेतकèयाचे हित जोपासणाèया संस्थेविरुध्द झालेल्या एका खासगी तक्रारीवरुन प्रशासनाने घेतलेल्या कठोर भूमिकेचा जिल्ह्यातील शासकीय धान खरेदी करणाèया संस्थांनी निषेध केला आहे. नागपूर विभागीय आधारभूत धान खरेदी सहकारी संस्थांचा संघ व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचा संघ या दोन्ही शासकीय धान खरेदी करणाèया संघांनी संस्थेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले.