मध्यप्रदेश पंचायत राज संचालनालयाच्या चमूचा अभ्यास दौरा

0
18

भंडारा,दि.21ः- पंचायत राज आणि ग्रामीण विकास विभाग मध्यप्रदेश सरकारच्या चमूने भंडारा जिल्ह्यात ग्राम पंचायत स्तरावर सुरू असलेल्या आपले सेवा सरकार प्रकल्पाचा अभ्यास करण्यासाठी जिल्हा परिषद व जिल्ह्यातील काही ग्राम पंचायतींना भेट देऊन अभ्यास केला. मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांचे हस्ते अभ्यास दौर्‍यात सहभागी झालेल्या पंचायत राज संचालनालयाच्या संचालक उर्मिला शुक्ला व त्यांच्या चमूला ग्रामगिता व टोपी देऊन स्वागत केले. तसेच आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या अंमलबजावणीची विस्तृत अशी माहिती दिली.
यावेळी प्रभारी संयुक्त तसेच उप महाप्रबंधक एस. के. नेमा, मुख्य कार्यकारी अधिकारी अवि प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप कुमार यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत मालवीय, मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव कुमार तिवारी, मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पांडे, पंचायत समन्वय अधिकारी एच.एस.शुक्ला, ग्राम पंचायत सचिव आनंद गुप्ता तर भंडारा जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश बागडे, गट विकास अधिकारी नूतन सावंत, विस्तार अधिकारी प्रमोद हुमने, बोरकर, बोदेले, आपले सरकार सेवा केंद्राचे जिल्हा व्यवस्थापक निकेशकुमार पटले, पंचायत समिती भंडारा तालुका व्यवस्थापक राकेश ठोंबरे, सिएससी केंद्राचे व्यवस्थापक दुर्गेश भोंगाडे, आशिष चव्हाण, प्रवीण बांडेबुचे आदींची उपस्थिती होती.
राज्यात असलेले भंडारा जिल्ह्याचे उल्लेखनिय कार्य बघणे व अभ्यास करण्यासाठी मध्यप्रदेश सरकारच्या पंचायतराज संचालनालयाच्या वतीने नुकताच भंडारा जिल्ह्यात अभ्यास दौरा पूर्ण केला. भंडारा जिल्ह्यात अंमलबजावणी करीत असलेल्या आपले सरकार सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामपंचायतस्तरावर जि टू सी मध्ये ११ अज्ञावली डॉटा एन्ट्रीचे कामे पूर्ण करणे, प्लॅन प्लस, प्रिया सॉप्ट, एरिया प्रोफाईल, एनपीपी, मिटींग मॅनेजमेंट, सोशिअल ऑडिट, रहिवासी दाखला, बिपीएल दाखला, उत्पनाचा दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट, जन्म मृत्यू व १ ते १९ प्रकारचे दाखले ग्रामस्थांना वितरीत करीत असल्याचे सांगितले.
तसेच बि टू सी अंतर्गत डिटीएच, मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रीक बिल, पॅन, आधारकार्ड, तसेच १ ते ३३ प्रकारचे नमुने नोंदी करण्यासोबतच नमुना ८, सातबारा, घरटॅक्स, पाणी पट्टी व घरपट्टी कर आदी कामे ऑनलाईन पध्दतीने सर्वसामान्य जनतेला आवश्यक असलेली कामे गावातच होत असल्याची विस्तृत माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी अभ्यास दौरा समितीला दिली.