पक्ष कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी भेटीला आलो-खा.पटेल

0
20

देवरी,दि.21ः-जेव्हा आमगाव विधानसभा हा भंडारा लोकसभा क्षेत्रात होता. त्यावेळी निवडणुकीत मला नेहमी देवरी तालुक्यातील नागरिकांनी भरघोषपणे आपले आशीर्वाद देऊन सहकार्य केले. त्यांचे प्रेमरूपी कर्ज मी कधीही फेडू शकणार नाही. मात्र, आता ही आमगाव विधानसभा हा गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात गेल्यानंतरही येथील लोकांनी माझ्या पक्षाला प्रेम दिले आहे. हे प्रेम नेहमी राहावे. आता विधानसभेची निवडणूक होणार आहे. आमच्या आघाडीच्या उमेदवाराला ही आपण असेच प्रेम व भरपूर पणे आशिर्वाद देऊन सहकार्य करावे आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीच्या कामाला लागावे. असे सांगण्याकरिता आणि देवरी तालुक्यातील नागरिकांच्या व पक्ष कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मी येथे प्रत्यक्ष भेटीला आलो आहे, असे प्रतिपादन राकॉंचे वरिष्ठ नेते आणि खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
ते देवरी तालुक्यातील सेरपार येथील स्व. चंद्रकला ताराम आदिवासी आर्शमशाळेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे सोमवारी आयोजित कार्यकर्ता भेट कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेरपारचे सरपंच सर्वानंद कवास हे होते. या प्रसंगी  म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्‍वरी, जि.प.चे माजी अध्यक्ष विजय शिवणकर, कृउबासचे सभापति रमेश ताराम, तालुका राकॉंचे अध्यक्ष महेश जैन, युवक राकॉं अध्यक्ष योगेश देशमुख, महिला आघाडी अध्यक्ष पारबताबाई चांदेवार, पं.स. सदस्य अर्चना ताराम, माजी नगराध्यक्ष सुमन बिसेन, अर्थ व नियोजन सभापति रितेश अग्रवाल, नगरसेवक नेमीचंद आंबीलकर, नगरसेविका माया निर्वाण, दविन्दर कौर भाटीया, गोपाल तिवारी, इंदल अरकरा, भास्कर धरमसहारे, भैय्यालाल चांदेवार, बबलू भाटीया, मनीष मोटघरे, चंचल जैन, अमरदास सोनबोईर, मनोहर राऊत, सत्यवान देशमुख, दिलीप कुंभरे, नितेश बालोदे यांच्यासह तालुक्यातील राकॉंचे पदाधिकारी व कार्यकर्ता बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्तावित रमेश ताराम यांनी तर संचालन नितेश वालोदे यांनी केले. तर आभार सी.के. बिसेन यांनी मानले.