भंडारा मतदारसंघात कमळ फुलणार,पटेलांना धक्का?

0
14

भंडारा-गोंदिया,दि.23: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत भाजपचे सुनील मेंढे यांनी ७४१८ मतांची आघाडी घेत राष्ट्रवादीच्या विजयाच्या मार्गात अडथळे निर्माण केल्याने राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांच्यासाठी चांगला धक्का मानला जात आहे. विदर्भात पहिल्या टप्प्यात लोकसभा निवडणूक होत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराच्या रूपाने सुनील मेंढे यांना निवडण्याचा घेतलेला निर्णय मतदारांनी पहिल्या फेरीपासून सार्थ ठरविल्याचे दिसत आहे.

या निकालामुळे भाजपच्या आजी माजी जेष्ठ नेत्यांची मात्र सद्दी आत्ता संपणार आहे.सुनिल मेंढे हे प्रचंड मताधिक्याने निवडून येतील यात शंका नाही. विकासाच्या मुद्यावर भाजप निवडणूक लढवित असून भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्रात बऱ्याच कामांना गती देण्यात आली आहे.गोंदिया शहरात तर या विजयासाठी येथील दुर्गा चौक परिसरात मोठी स्क्रीन लावून विजयाचा जल्लोष साजरा करण्यासाठी भाजप कार्यकर्ते पदाधिकारी व हितचिंतक एकत्र झाले आहेत.

पहिल्या फेरीमध्ये भाजपचे  सुनील मेंढे यांना 25082 मते मिळाली आहेत तर राष्ट्रवादी काँगेसचे नाना पंचबुधे 17670 यांना मते मिळाली आहेत बसपच्या डाॅ.विजया नंदुरकर या 1595 मते घेऊन तिसर्या क्रमांकावर दिसून येत आहेत.

दुसरी फेरी: गोंदिया-513,साकोली-898,भंडारा-2250,तुमसर-1872,अर्जुनी/मोर-827,तिरोडा-1800 मते घेत भाजपाला-15578 ची आघाडी मिळाली आहे.

चौथी फेरी: गोंदिया-954,साकोली-39अर्जुनी/मोर-823,तुमसर-1300, तिरोडा-1937,भंडारा-1136 चौथ्या फेरीत 6021 मतांनी भाजपाला आघाडी