खत दरवाढ बळीराजासाठी दुष्काळात तेरावा महिना;डीएपी बँग २०० रुपयांनी महागली

0
16

संतोष रोकडे/अर्जूनी/मोर,दि.25ः-गेल्या वर्षी झालेला अत्यल्प पाऊस.परिणामी कमी उत्पादन .यातही भर मह्णजे शेती मालाला भाव नाही.दिवसागणिक वाढत असलेली महागाई.धान पिकावर रोगाचा प्रार्दुभाव यासह ईतर कारणांमुळे बळीराजा पिचला जात असतांनाच या वर्षी काही रासायनिक खतांचा किंमतीमध्ये प्रतिबँग २०० रुपये भाववाढ झाली आहे.त्यामुळे अगोदरच दुष्काळाच्या झळांनी त्रस्त झालेल्या शेतकर्याना दुष्काळात तेरावा महिना चा सामना करावा लागणार आहे.
अर्जूनी /मोर तालुक्यात गत वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे बळीराजाच्या उत्पन्नात कमालीची घट आली आहे. घरात शेतमाल येत नाही तोच बाजारभाव पडले.त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या तालुक्यात सर्वत्र चारा व पाणीटंचाई निर्माण झाली आहे .सततची नापिकी.कधी ओला.तर कधी कोरडा दुष्काळ.धान पिकावर विविध रोगांचे आक्रमण .तर दिवसागणीक वाढत जाणारी महागाई यासह शेतकरी विविध संकटाचा सामना करत खरिपाच्या मशागतीला लागला आहे. परंतु या वर्षी खत उत्पादक कंपन्यांनी रासायनिक खतांच्या किंमतींमध्ये २०० रुपयांनी प्रती बँग भाववाढ करुन दुष्काळग्रस्त बळीराजाला आर्थिक दरीत लोटले आहे.युरिया वगळता सर्वच खताच्या बँगमागे काही प्रमाणात वाढ झाली आहे. तालुक्यातील धान उत्पादक शेतकरी सर्वाधिक डीएपी.२०;२०;२० .या खतासह युरिया खताचा वापर करतात. परंतु दर वाढल्याने बळीराजा चिंतातुर झाला आहे. आजही अनेक ठिकाणी सेंद्रीय शेती केली जाते अनेक वर्षांपासून शेतात शेणखत विकत घेऊन टाकले जाते पण शेणखताचेसुद्धा दर वाढ झाली आहे. गावखेड्यात कमी झालेली जनावर संख्या त्यामुळे शेणखत कमी होत आहे. पर्यायाने बळीराजाला रासायनिक खताशिवाय पर्याय रहिला नाही.
यंदा असलेले खतांचे भाव
डीएपी १४००रुपये प्रती बँग.१०-२६-२६ प्रती बँग १३४० रुपये.१२-३२-१६प्रती बँग १३५०.रुपये.२०-२०-१३पती बँग १०६५ रुपये.पोटँश ९५० रुपये.
देशभरामध्ये सर्वत्र खताच्या किंमती वाढल्या आहेत रासायनिक खतांच्या किंमती ठरविण्त्राचे अधिकार केंद्र सरकारला असल्याने संम्पुर्ण देशात एकसारख्या आहेत यात शेतकरी होरपळला जात आहे.