24.2 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home विदर्भ तुडका येथे तीन घरांना आग

तुडका येथे तीन घरांना आग

0
30

तुमसर,दि.26ः- जवळच्या तुडका येथे शॉर्ट सर्किटमुळे तीन घरांना भीषण आग लागली. या आगीत घरासह तीन बकरी, गाय, वासरू तसेच दुचाकी व सायकल भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना शनिवारी दुपारी १ च्या सुमारास घडली.
तुडका येथील मधुकर वाडीभस्मे हे कुटुंबासह घरी असताना अचानकच दुपारी घरातील मिटरमध्ये शॉर्टसर्किट होऊन घराला व लागूनच असलेल्या जनावरांच्या गोठय़ाला आग लागली. क्षणात आगीने रौद्ररूप धारण करीत ५0 फूट अंतरावर असलेल्या दोन घरांनाही लक्ष्य केले. यात मधुकर वाडीभस्मे यांचे घर व गोठा पूर्णत: जळाले. गोठय़ातील ३ बकरी, गाय, वासरू तसेच सायकल व दुचाकी पूर्णत: जळाले. सुरेश पंधरे व गोविंद भिवगडे यांचे घराला मागच्या बाजूला आग लागून घरातील साहित्य जळाले. गावकर्‍यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. तुमसर नगर परिषदेचे अग्निशमन बंब बोलाविले. तोपर्यंत सर्वच भस्मसात झाले होते.

blank