डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत ४६ सेंद्रिय शेती गटांची होणार निवड

0
148
  • ६ जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. २८ : डॉ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत (सेंद्रिय शेती) सन २०१९-२० अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील ६ तालुक्यातून ४६ सेंद्रिय गटांची निवड करण्यात येणार आहे. याकरिता इच्छुक शेतकरी, सेंद्रिय शेती गटांनी आपले अर्ज ६ जून २०१९ पर्यंत संबंधित तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर सादर करावेतअसे आवाहन आत्मामार्फत करण्यात आले आहे.

गटात भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांनी तीन वर्षे सेंद्रिय शेती योजनेत भाग घेणे बंधनकारक राहील. एका शेतकऱ्यास १ एकर व जास्तीत जास्त २.५ एकर पर्यंत लाभ घेता येईल. रासायनिक कीटकनाशकेरासायनिक खते वापरणार नाहीअसे प्रतिज्ञापत्र लिहून देणे बंधनकारक राहील. यापूर्वी सेंद्रिय शेती कार्यक्रमात भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य राहील. एका गावातील पूर्ण गट हा महिलांचा होत असल्यास त्यांना प्राधान्य राहील. त्यामध्ये महिला बचत गटशेती महिला मंडळाचा समावेश असावा. त्याचप्रमाणे ५० एकराचे गट करतांना १६ टक्के अनुसूचित जाती व ८ टक्के अनुसूचित जमातीचे शेतकरी असावेत.

आत्मा अंतर्गत नोंदणीकृत असलेल्या गट अथवा समूह शेतकरी उतपादक कंपनीला प्राधान्य राहील. या योजनेमध्ये अनुसूचित जातीअनुसूचित जमाती गटांना प्राधान्य राहील. संसद सदस्यविधानमंडळ सदस्य यांनी संसद ग्राम योजने अंतर्गत निवडलेल्या गावांमधील गटांना प्राधान्य राहील. गटात समाविष्ठ होणाऱ्या शेतकऱ्यांकडे किमान २ पशुधन असावे. गटातील शेतकऱ्यांकडे बँकेचे खाते असावे. कोरडवाहू व बागायती क्षेत्राचे स्वतंत्र गट करावेत. त्यामध्ये कोरडवाहू क्षेत्रास प्राधान्य राहील. प्रत्येक लाभार्थ्याने दरवर्षी मातीपाणी तपासून घेणे बंधनकारक राहील. अपारंपरिक उर्जास्त्रोताचा वापर करणाऱ्या लाभार्थ्यास प्राधान्य राहील. तरी इच्छुक शेतकरी गटांनी ६ जून २०१९ पर्यंत तालुका कृषि अधिकारी कार्यालयात आत्माचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अथवा सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक यांच्याकडे सादर सादर करावेत.

अधिक माहितीसाठी जयप्रकाश लव्हाळेवाशिम (भ्र. क्र.- ७९७२४७१५८१)विजय दुधेमंगरूळपीर (भ्र. क्र.-९४२३४६५०५२)मयूर शिरभातेरिसोड (भ्र. क्र.- ८६२४०३४०३८),प्रतिक राऊतमानोरा (भ्र. क्र.-९१३०६८९०३७)सचिन इंगोलेमालेगाव (भ्र. क्र.- ९६२३३५३९८१)दिनेश पटकेकारंजा (भ्र. क्र.- ९४२२७६१२७७) यांच्याशी संपर्क साधावाअसे आवाहनआत्माचे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.