आंबा पिकाकडे शेतकर्‍यांनी आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे

0
21

गडचिरोली,दि.08ः-जिल्ह्यातील वातावरण आंबा फळपिकास अनुकूल असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी आंबा पिकाकडे आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून बघावे, असा सूर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्र सोनापूर येथे ‘आंबा महोत्सव २0१९’ आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलत होते.
उद््घाटन मध्यप्रदेशातील सिजयराजे सिंदीया विश्‍व विद्यालय सिहोरचे नवृत्त प्रथम शास्त्रज्ञ डॉ. ए. एन. टिकले यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरडकर, सहा. प्राध्यापक डॉ. एकता निगोट, उपविभाग प्रमुख संदीप लांजेवार, प्रगतशील महिला शेतकरी प्रतिभा चौधरी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. टिकले म्हणाले, महोत्सवामध्ये आलेल्या स्थानिक वाणांचा प्रसार आणि प्रचार तसेच संवर्धन होण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे आहे. गडचिरोली जिल्हा हा विदर्भातील नंदनवन म्हणाल तर हरकत नाही. हीच जैवविविधता येथील शेतकरी बांधवांना त्यांची आर्थिक स्थिती उंचावण्याकरिता मदतीचा एक स्त्रोत असल्याचे सांगितले. हा महोत्सव कृषी विज्ञान केंद्राने आयोजीत केला हे शेतकर्‍यांच्या दृष्टीने फायदेशिर आहे. यापासून प्रेरणा घेऊन शेतकर्‍यांनी उन्नती करावी, अशी आशा व्यक्त केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले.
या आंबा महोत्सवात जिल्ह्यातील आंब्याचे स्थानिक वाण तसेच महाराष्ट्रात उत्पादीत सुधारीत आंबा वाण प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आले. तसेच आंबा मुल्यवर्धित पदार्थ जसे जाम, जेली, चॉकलेट, आईसक्रीम, बर्फी, लोणचे, पन्हे, कोल्ड्रीक आदी प्रक्रियायुक्त पदार्थ प्रदर्शनीमध्ये मांडण्यात आले. या आंबा महोत्सवादरम्यान आंबा उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आंबा महोत्सवास जिल्ह्यातील शेतकरी, गृहीणी, विद्यार्थ्यांनी भेट दिली. महोत्सवास विषय विशेषज्ज्ञ ज्ञानेश्‍वर ताथोड, पुष्पक बोथीकर, डॉ. विक्रम कदम, एन. पी. बुद्धवार, दीपक चव्हाण, सुनिता थोटे, मोहीतकुमार गणवीर, भोजराज कुमरे, शशिकांत सलामे, अंकूश ठाकरे, हितेश राठोड, गजेंद्र मानकर उपस्थित होते.