आंतरराष्ट्रीय योग दिनाचे शुक्रवारला आयोजन  

0
8

वाशिम, दि. 20 :आंतरराष्ट्रीय योग दिन उद्या शुक्रवारला जिल्हयात साजरा करण्यात येणार आहे. जिल्हयातील ग्रामीण आणि शहरी भागात हा योग दिवस सर्वांच्या सहभागातून साजरा करण्यात येणार आहे.योग दिनाचे औचित्य साधून जिल्हयाचा मुख्य कार्यक्रम वाशिम येथील वाटाणे लॉन येथे  21 जून रोजी सकाळी 7 ते सकाळी 8 या दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री संजय राठोड, खा. भावना गवळी, आमदार सर्वश्री लखन मलिक, राजेंद्र पाटणी, अमित झनक, जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्र परदेशी तसेच लोकप्रतिनिधी, योगा क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विविध योगा संस्थेचे पदाधिकारी, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी व नागरीक उपस्थित राहणार आहे.

मानोरा येथील राधाकृष्ण मराठी शाळेमध्ये स्वातीताई नागपुरे, कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलामध्ये गजानन धर्माळे व अर्चना कदम, मंगरुळपीर येथील तालुका क्रीडा संकुलात नंदकिशोर इंगोले, कल्याणी व्यवहारे व श्री. ठाकरे, मालेगाव येथे एन.एन. मुंदडा हायस्कुलमध्ये अर्चना मंत्री, गोपाल राऊत व श्री. जावडे आणि रिसोड येथील बाबासाहेब धाबेकर महाविद्यालयात शितल जिरवणकर हया उपस्थितांना योगाबाबत आज 21 जून रोजी सकाळी 7 ते सकाळी 8 यावेळेत प्रशिक्षण देतील. तसेच जिल्हयातील 92 प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत सुध्दा प्रशिक्षीत योग शिक्षकामार्फत ग्रामस्थांना योगाचे प्रशिक्षण देवून त्यांना योगाचे महत्व पटवून देणार आहे.विविध शासकीय यंत्रणा, पतंजली, आर्ट ऑफ लिव्हींग, विद्या भारती, भारत स्वाभिमान, नेहरु युवा केंद्र, भारत स्काऊट आणि गाईड, राष्ट्रीय सेवा योजना, योगाचा प्रचार प्रसार करणाऱ्या संस्था तसेच योगपटू योग दिनाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी सहभागी होणार आहे.