७ एप्रिल ते १ मे दरम्यान बाल आरोग्य अभियान

0
14

्गोंदिया : राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ७ एप्रिल या जागतिक आरोग्य दिनापासून बालकांच्या सर्वांगिण आरोग्यासाठी बाल आरोग्य अभियानाची सुरुवात होत आहे. हे अभियान ७ एप्रिल ते १ मे २0१५ दरम्यान राबविले जाणार आहे.
या अभियानाचे उद््घाटन जिल्हाधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे हे प्रमुख अतिथी म्हणून तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.रवि धकाते अध्यक्षस्थानी राहतील. सकाळी १0वाजता या अभियानाचा शुभारंभ होईल. यावेळी बाईगंगाबाई स्त्री रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संजीव दोडके, निवासी वैद्यकीय अकिारी डॉ.अमरीश मोहबे, वरिष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश लाटणे, आरएमओ डॉ. विनोद वाघमारे, रक्त संक्रमण अधिकारी डॉ. सुवर्णा हुबेकर उपस्थित राहतील. ७एप्रिल या जागतिक आरोग्य दिनापासून शुभारंभ होणार्‍या या अभियानामध्ये कुपोषित बालकांची मोफत तपासणी, उपचार, लसीकरण कार्यक्रम सुदृढ बालक स्पर्धा, क्षार जलसंजीवनी कॉर्नर, न्यू वॉर्न बेबो कक्ष स्थापना, हिरकणी कक्ष स्थापना, जीवनसत्व अ लसीकरण, बालकांना जंतनाशाकांचा डोज पाजणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहे.
सुरक्षित मातृत्व व बालजीवत्व हमी या तत्वानुसार गर्भवतींना फोलीक अँसीड डोज देणे, डाएट क्लिनीकचे आयोजन, पोषाहार प्रदर्शनी, अति जोखमीच्या माताच्या तसेच गर्भस्थ शिशुंची देखभाल व तपासण्यांचे विशेष मोफत शिविरे, नवजात बाळांचे व्यंगत्व शोधून त्यावर उपचारांचे शिबिरे, क्षार जलसंजीवनीबाबत प्रचार व प्रसार केला जाणार आहे.