उत्कृष्ट कामासाठी रासेयोचा प्रा.डॉ. राजेश चांडक यांना पुरस्कार

0
16

अर्जुनी-मोरगाव : स्थानिक एस.एस.जे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव पाटणकर व रासेयोचे गोंदिया जिल्हा समन्वयक प्रा.डॉ. राजेश चांडक यांना उल्लेखनीय कार्याबद्दल सन २0१३-१४ चा राष्ट्रीय सेवा योजनेचा रातुम विद्यापीठ नागपूर विद्यापीठस्तरीय पुरस्कार देण्यात आला. नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्रा. कुलगुरू, डॉ. चांदेकर, कुलसचिव डॉ.गोमासे, रासेयोचे कार्यक्रम समन्वयक डॉ. भाऊ दायदार यांच्या उपस्थितीत डॉ.विकास महात्मे यांच्या हस्ते सदर पुरस्काराचे वितरण शनिवारी करण्यात आले. एस.एस.जे.महाविद्यालयाला रासेयोचा उत्कृष्ट महाविद्यालयाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे.डॉ. चांडक मागील नऊवर्षापासून रासेयो कार्यक्रम अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी राज्य व विद्यापीठस्तरावर विविध शिबिरांचे आयोजन केले. दरवर्षी रक्तदान शिबिर घेऊन स्वत: ४0 वेळा रक्तदान केले.याव्दारे त्यांनी सामाजिक जाणीव व दायित्वाची चुणूक आपल्या कार्यातून दाखविली. योगाचे महत्व पटवून देण्यासाठी त्यांनी आजतागायत २0 योगा शिबिराचे आयोजन करून आरोग्यविषयक विचार समाजात रूजविले.