वृक्ष दिंडी आगमनानिमित्त  गौतमनगर परिसरात वृक्षारोपण

0
36
गोंदिया,दि. २७ :-राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून यावर्षी ३३ कोटी वृक्ष लावगडीचा संकल्प पूर्ण करण्यात येत आहे. आ. प्रा. अनिल सोले यांच्या नेतृत्वात ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशन वृक्षारोपण व संवर्धनाच्या जनजागृतीसाठी वृक्षदींडीच्या माध्यमातून कार्य करीत आहे. आज बदलत्या वातावरणामुळे जी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे त्याला आपण स्वत: जबाबदार आहोत. त्यामुळे या परिस्थितीतून बाहेर निघण्यासाठी ‘गाव तिथे-पानवठा व गाव तिथे-जंगल’ निर्माण करण्याचा संकल्प प्रत्येकाने घ्यावा, असे आवाहन वृक्ष दींडीचे सह संयोजक प्रशांत कांबळी यांनी केले.
ते ग्रीन अर्थ आॅर्गनायजेशन तर्फे २७ जून रोजी आयोजित वृक्ष दींडी यात्रेच्या गोंदिया येथे आगमनाप्रसंगी वाजपेयी वॉर्ड गौतमनगर येथील शितला माता मंदिर परिसरात आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने वृक्ष दींडीचे संयोजक आशिष वांदिले, भाजपा जिल्हाध्यक्ष व माजी आमदार हेमंत पटले,  नगराध्यक्ष अशोक इंगळे, माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, उपवनसंरक्षक एस. युवराज, सुधीर कायरकर, किशोर पाटील, सुरेश सवई, सुनिल गफाट, माजी जिप अध्यक्ष नेतराम कटरे, नप उपाध्यक्ष शिव शर्मा, जिप सभापती शैलजा सोनवाने,वर्षा खरोले, नगरसेवक राजू कुथे, अफसाना पठाण, सहायक उपवनसंरक्षक एन. एस. शेंडे, श्री. शेख, शहर अध्यक्ष सुनिल केलनका,नंदकुमार बिसेन, संतोष चव्हाण,संजय कुलकर्णी, वनपरिक्षेत्राधिकारी सुशिल नांदवटे, लागवड अधिकारी स्वाती डुंभरे, श्री साबळे, मुकूंद धुर्वे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सहायक उपवनसंरक्षक शेंडे यांनी करुन शासनाचा या योजनेमागचा उद्देश व कार्यपध्दती सांगितली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सर्पमित्रांचा प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यात विशाल भस्मे, सलीम पठाण, मुरलीधर सोनवाने, सचिन दमाहे, दिगंबर दमाहे यांचा समावेश आहे. संचालन मां शितला सेवा समितीचे सचिव जयंत शुक्ला यांनी केले.
आयोजनासाठी शामचंद्र येरपुडे, डॉ. विपीन बैस, सदाशिव जायस्वाल, हेमंत बडोले, आत्माराम चव्हाण, शिवपाल सोनपुरे, उपासराव उरकुडे, दारा बैरिसाल, राजेश खरोले, मुन्ना उरकुडे, घनशाम फंदी, रामकुमार आग्रे, विजय हलमारे, मनिष गहरवार, बबलू बुंभर, मुकेश हलमारे, राजेश फाये, शैलेश राजुरकर, सदाराम शेंद्रे, सुकनंदन सोनपुरे, संजय राजुरकर, संतोष उईके, किशोर गहरवार, निळकंठ मेश्राम, रिक्की चन्ने, राजू पटले,  हंसराज वासनिक, भारती शुक्ला, सुमन येरपुडे, रुक्मिनी बैस, ममता गहरवार, विठाबाई चव्हाण, मुन्नी चित्रीव, निशा उरकुडे, निर्मला आग्रे,श्रीमती दमाहे,  श्रीमती हलमारे, सताबाई काळे आदींनी परिश्रम घेतले.
००००००