26.9 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरओचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आरओचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

0
31

भंडारा,दि.7 :- : जिल्हा सामान्य रुग्णालय, भंडारा येथील रुग्णांना व नातेवाईकांना पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांच्या आमदार निधीमधून सामान्य रुग्णालयात आरओ प्लांट लावण्यात आला. या प्लांटचे पालकमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्याता आले. यावेळी खासदार सुनिल मेंढे, आमदार रामचंद अवसरे, बाळाभाऊ अंजनकर, तुमसरचे नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, न,प उपाध्यक्ष आशु गोंडाने व डॉक्टर मोठ्या संख्येनी उपस्थित होते.
सामान्य रुग्णालय, भंडारा येथील रुग्णांना व नातेवाईकांना पिण्याचे शुध्द पाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांना इतर ठिकाणी भटकंती करावी लागत होती. त्यामुळे आरओ प्लांट लावण्याबाबत डॉ.परिणय फुके यांच्याकडे मागणी करण्यात आलेली होती. त्याअनुषंगाने डॉ.परिणय फुके यांच्या स्थानिक विकास निधीतून आरओ प्लांट मंजूर करण्यात आले. या आरओ प्लांट चे लोकार्पण डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.