आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृहातील समस्या त्वरित मार्गी लावा : डॉ.परिणय फुके

0
22

भंडारा दि.07 :- आदिवासी मुलांचे शासकीय वसतीगृह भंडारा येथे आदिवासी विकास राज्यमंत्री तथा पालकमंत्री  डॉ. परिणय फुके यांनी भेट देऊन वसतीगृहामधील निवासाची प्रसाधनगृहाची पाहणी करून विद्यार्थांच्या इतर समस्या जाणून घेतल्या. वसतीगृहामधील अस्वच्छता दिसताच अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. विद्यार्थ्यांशी जवळपास दोन तास चर्चा करून विविध विषयावर चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या त्वरित मार्गी लावा असे निर्देश पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधी मंडळ कडून भंडारा जिल्ह्यातील नवीन दोन मंजूर वसतीगृह बांधकाम करणे ,अंबागड तालुका तुमसर येथील आदिवासींचे प्राचीन संस्कृतीचे जतन करून पर्यटन स्थळ घोषित करून अ दर्जा देणे,आदिवासी विद्यार्थ्यांची सुवर्ण महोत्सव शिष्यवृत्ती तसेच महाविद्यालयीन शिष्यवृत्ती दीड ते दोन वर्षे प्रलंबित असून ते तत्काळ देण्यात यावे.यशदा तथा बार्टीच्या सारखे उपक्रम राबवून भंडारा जिल्ह्यात स्पर्धा परीक्षांचे दर्जेदार प्रशिक्षण देण्यात यावे.बीएआरटीआय या संस्थेच्या धर्तीवर टीआरटीआय ला आयएसएम या कोचिंगच्या हिशोबाने दर्जा वाढविण्यात यावे अशा विविध मागण्या प्रतिनिधीनी यावेळी पालकमंत्री डॉ.परीणय फुके यांच्या समोर ठेवल्या. यावर सर्व विषयांचे गांभीर्य लक्षात घेऊन समस्या तात्काळ मार्गी लावण्याचे आदेश डॉ.परिणय फुके यांनी आदिवासी विभागाच्या प्रधान सचिव श्रीमती मनीषा वर्मा व आदिवासी विभागाचे आयुक्त श्री कुलकर्णी यांना दिले.यावेळी खासदार सुनील मेंढे,जिल्हा संघटन महामंत्री वीरेंद्र अंजनकर,आदिवासी नेते लक्ष्मीकांत सलामे,तोफलाल रहागडाले,रवींद्र सलामे , संदीप मेश्राम उपस्थित होते.