पालकमंत्री फुकेंच्या हस्ते गोवारी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

0
16
गोंदिया,दि.07ः- आदिवासी गोवारी जमातीतील गुणवंत विद्याथ्र्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन मिळण्यासाठी ,आदिवासी गोवारी जमातीच्या सामाजिक ,शैक्षणिक व आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी व सोबतच खिल्या-मुठया देवस्थानाचे जिर्णोद्धार व 114 गोवारी शहीद स्मारकाचे भूमिपूजन आज 7 जुलै रोजी राज्याचे सार्वजनिक बांधकाम,वन व आदिवासी विकास तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांच्या हस्ते पार पडले.सदर कार्यक्रम सांस्कृतिक पोवार बोर्डिंग येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे उद्घाटन सार्वजनिक बांधकाम,वने व आदिवासी विकास विभागाचे राज्यमंत्री तसेच गोंदिया-भंडारा जिल्हयाचे पालकमंत्री डाॅ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले.अध्यक्षस्थानी गोवारी समाजाचे मुख्य समन्वयक शालिक नेवारे हे होते.  शहीद स्मारकाचे भूमिपूजक म्हणून भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य विनोद अग्रवाल,तिरोड्याचे आमदार विजय रहागंडाले नगराध्यक्ष अशोक इंगळे,गोवारी समाजाचे गोंदिया जिल्हाध्यक्ष का.ज.गजबे,राजेश चतुर,सुनिल केलनका,नरेंद्र तुरकर , नाना ठाकुर, हेमंत आम्बेडारे, माधव चचाने, रत्नेश कोहरु, सौ. प्रमिलाताई गजबे, नगर परिषद सभापती दीपक बोबडे आदी मान्यवर उपस्थित राहणार होते.याप्रसंगी समाजातील इयत्ता 10,12 वी पदव्युत्तर अभ्यासक्रम पुर्ण करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांचा स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पालकमंत्री फुके यांनी गोवारी समाजाला पुर्ण न्याय देण्याची तयारी सरकारची असून सरकारने समाजाला आदिवासी समाजाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतल्याचे सुतोवाच करीत सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.
आयोजनासाठी कार्यक्रमाचे आयोजक गुलाब नेवारे, ज्ञानेश्वर राउत,  मोहन नेवारे, सौ.मधुमती नेवारे, राधेश्याम कोहळे, गेंदलाल नेवारे, प्रेमलाल शहारे,प्रल्हाद शहारे, प्रमोद शहारे, डी.टी.चैधरी, रतिराम राउत, शंकर खेकरे ,संजय राउत समाजबांधवानी प्रयत्न केले.