लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातूनच लोकांचा विकास शक्य -आ. पुराम

0
20

देवरी ,दि.१०ः-: पंतप्रधान घरकुल योजनेतील लाभ घेण्याकरीता स्वत:च्या मालकीची जागा हवी परंतु, देवरी येथील अधिकांशी लोकांजवळ स्वत:च्या मालकीची जागा नाही. या योजनेचा लाभ येथील जास्तीत-जास्त लोकांना कशा प्रकारे मिळतील या करीता येथील लोकांच्या मागणीवरून शासनस्तरावर पाठपुरावा करून आज शहरातील ४0 बेघर कुटुंबांतील लोकांना जमिनीचे मालक बनविले. या योजनांचा लोकप्रतिनिधींच्या प्रयत्नातून मिळाला तर लोकांचा विकास शक्य होण्याचे प्रतिपादन आमदार संजय पुराम यांनी केले.
ते देवरी येथील आफताब मंगल कार्यालयात ८ जुलै रोजी नगर पंचायतच्या वतीने पंतप्रधान घरकुल योजनेचे धनादेश व जमिनीचे पट्टे वाटप कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमात मंजूर घरकुलांपैकी १२0 लाभार्थ्यांना पहिल्या हफ्त्याचे ४0 हजार रुपये प्रमाणे धनादेश व शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल करून एकूण २0 लाभार्थ्यांना जमिनीचे मालकी पट्टे आ. पुराम यांच्या हस्ते देण्यात आले. याप्रसंगी देवरीच्या नगराध्यक्ष कौशलबाईकुंभरे, उपाध्यक्ष आफताब शेख ऊर्फ अन्नू भाई, उपविभागीय अधिकारी रविंद्र राठोड, तहसीलदार विजय बोकडे, श्री बडगेलवार, मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे, सभापति ओमप्रकाश रामटेके, रितेश अग्रवाल, सुमन बिसेन, गटनेता संतोष तिवारी, नगरसेवक नेमीचंद आंबीलकर, प्रवीण दहिकर, संजू उईके, यादोराव पंचमवार, नगरसेविका मायाताई निर्वाण, पूजा दखने, दविन्दर कौर भाटीया, भूमिता बागडे, हेमलता कुंभरे यांच्या सह नगरपंचायतचे सर्व अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी व नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी राजेंद्र चिखलखुंदे यांनी तर संचालन व आभार अमोल पटले यांनी मानले.