तुमसर रेल्वे क्रॉसिंगचे काम तत्काळ पूर्ण करा- डॉ. परिणय फुके

0
22

मुंबई दि. 10 : सार्वजनिक बांधकाम विभागाने भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथील रेल्वे क्रॉसिंगवर दोन्ही बाजूचे ॲप्रोच रोड पूर्ण केले आहेत. रेल्वे क्रॉसिंगचे काम रेल्वे विभागाची परवानगी घेऊन तत्काळ पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री डॉ. परिणय फुके यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज दिले.सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज सार्वजनिक बांधकाम आणि एमआरआयडीसी संदर्भात बैठक घेण्यात आली. यावेळी महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जयस्वाल उपस्थित होते.

डॉ. फुके यांनी यावेळी सांगितले की, सार्वजनिक बांधकाम विभागाने एमआरआयडीसीला महाराष्ट्रात प्रस्तावित असलेल्या रेल्वे क्रॉसिंगची मान्यता देण्याबाबत पाठपुरावा करावा. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या mahapwd.com या संकेतस्थळावर जावून संबधित व्यक्तींनी खड्डा कुठे पडला आहे याबाबतची माहिती अपलोड केल्यानंतर ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पोहचते किंवा टोल फ्री नंबरवर फोन करुन सुध्दा खड्डे कुठे पडले आहेत याबाबतची माहिती कळविली जावू शकते.

सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाबाबत शासकीय निवासस्थाने, पार्किंग, कमर्शियल स्पेस आणि सेलेबल स्पेस याचे शासनास किफायतशीर व कमी कालावधीत अंमलबजावणी करता येईल असे मॉडेल तयार करण्यास राज्यमंत्री डॉ. फुके यांनी सूचित केले.

तसेच डॉ. फुके यांच्या दालनात पठोले ट्रेडिंग सिस्टीम यांनी तयार केलेल्या रस्त्यांच्या खड्डयांबाबतची माहिती शासनाला कशी मिळेल याबाबतच्या ॲपचे उत्तमरित्या सादरीकरण करण्यात आले. या सादरकीकरणामध्ये नेमके खड्डयांचे फोटो काढून ॲपवर किंवा संकेतस्थळावर अपलोड केले असता त्याची माहिती तत्काळ अपलोड करता त्यांच्याकडे एस.एम.एस. द्वारे उपलब्ध होते. व त्यांची खडयांबाबतची तक्रार पूर्ण होईपर्यंत त्यांना एस.एम.एस. द्वारे माहिती उपलब्ध होत राहील.