मतदारसंघात पर्यटन विकासासाठी केंद्र सरकार कटिबद्ध – खा. सुनील मेंढे

0
9

नवी दिल्ली,दि.15ः-भंडारा गोंदिया लोकसभा मतदार संघातील नागझिरा कोका वन्यजीव अभयारण्य  तसेच नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथील पर्यटन विकासाला केंद्र सरकार सर्वोतोपरी सहकार्य करणार असून ह्या संबंधी राज्य सरकार द्वारे तयार करण्यात येणारा आराखडा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाला सादर झाल्यानंतर त्यानुसार पुढील कार्यवाही तातडीने करण्याचे आश्वासन केंद्रीय पर्यटन मंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रल्हाद पटेल ह्यांनी दिल्याचे खासदार सुनील मेंढे ह्यांनी सांगितले. ह्या संबंधी खासदार सुनील मेंढे ह्यांनी आज लोकसभेत  विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना पटेल पुढे म्हणाले, ” केंद्र सरकारच्या स्वदेश दर्शन स्कीम” अंतर्गत या आणि देशातील अन्य अभयारण्याच्या पर्यटन विकास साठी सरकार प्रयत्नशील आहे.
दरम्यान संबंधित वन क्षेत्रातील  बफर झोन मध्ये राहणाऱ्या लोकांसाठी रोजगार निर्मितीचा प्रश्न लक्षात घेऊन मेंढे ह्यांनी विचारलेल्या पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना पटेल म्हणाले,” बफर झोन मधील लोकांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे म्हणून केंद्र सरकार द्वारे आर्थिक मदत देण्यात येते. पण त्याच बरोबरच खासदारांनी सुचविल्यानुसार पर्यावरण व वन मंत्रालय आणि राज्य सरकारने ह्या संबंधी काही विशेष योजना आणल्यास आपण त्या बाबतीत नक्कीच सकारात्मक विचार करू”. ह्लया अनुशांगाने लवकरच ह्या संबंधी राज्य सरकार आणि पर्यावरण व वन मंत्रालयाशी चर्चा करून विशेष योजना तयार करणार असल्याचे खासदार मेंढे ह्यांनी नमूद केले.