शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचावी : पालकमंत्री डॉ परिणय फुके

0
12

गोंदिया,दि.15ः- राज्यशासनाच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या सर्व योजना सर्वसामान्य नागरिकांसोबतच शेवटच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रामाणिकपणे काम करावे असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सार्वजनिक बांधकाम,आदिवासी विकास व वन राज्यमंत्री डाॅ.परिणय फुके यांनी केले.ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गोंदिया मार्फत आयोजित पं.दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी बोलत होते.यावेळी डाॅ. फुके यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन व शिधा पत्रिका (राशन कार्ड) वाटप करण्यात आले. यावेळी आमदार  विजय रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ दयानिधी राजा, पुरवठा अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी वर्ग तसेच मोठ्या संख्येनी लाभार्थी उपस्थित होते.

याप्रसंगी पालकमंत्री डॉ परिणय फुके म्हणाले की, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तर्फे जिल्हयातील 120000 लोकांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात येणार आहे. तसेच 618650 लोकांना शिधा पत्रिका (राशन कार्ड ) वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतर्फे नागरिकांना 10 किलो गहू 2 रु. व 25 किलो तांदूळ 3 रु प्रमाणे मिळणार आहेत,या योजना शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचवायचे असून 14 ऑगस्ट पर्यत हि योजना पूर्णपणे कार्यन्वित करण्यात यावी असे  निर्देश  दिले.