अटल विश्वकर्मा सन्मान योजनेअंतर्गत विशेष नोंदणी व नूतनीकरण अभियान

0
30

गोंदिया,दि.१६.: महाराष्ट्र इमारत व इमारत इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत बांधकामाच्या मूळ व्याखेत अंतर्भुत २१ कामावरील जसे- बार बेंडर, विटभट्टी कामगार, सुतारकाम, सेंटरींग, खोदकाम, वीजजोडणी (वायरमन), अभाशी छत बसविणारा, फिटर, मदतनीस, अंतर्गत सजावट करणारा, हेवी इंजी.कंस्ट, संगमरवर व कडप्प्याची कामे करणारे, गवंडी, बांधकामाच्या ठिकाणी मिक्सर किंवा रोलर चालवणारा, यंत्रचालक, मोझेक कामगार, गटारकाम किंवा नळजोडणीचे काम करणारा, खाण कामगार, स्पॅरीमॅन किंवा रोड सर्फिंग दगड कापणे किंवा फोडणे व दगडाचा बारीक चुरा करणारे, थॅटचर किंवा लोहार किंवा सेवर किंवा कॉलकर, बांधकामाच्या ठिकाणावर सुरक्षा रक्षक, वेल्डर, वेल सिंकर, वुडन किंवा स्टोन पॅकर, समुद्राच्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्याचे काम करणारे, चुनाभट्टीचे काम करणारे, इतर विशेष नोंदणी अभियानाची १५ जूनपासून सुरुवात झाली असून १४ ऑगस्ट २०१९ पर्यंत जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.
वरील बांधकाम स्वरुपाची कामे करणारे संबंधीत कामगारांनी आपली नोंदणी व नोंदीत बांधकाम कामगारांनी आपल्या नोंदणीचे नूतनीकरण नोंदणी केंद्र १ सहायक कामगार आयुक्त कार्यालय गोंदिया, सर्व पंचायत समिती व सर्व नगरपरिषद येथे करुन घ्यावे.
लाभार्थी म्हणून नोंदणी व नूतनीकरण करण्याकरीता अर्जदाराने विहित नमून्यात पुढीलप्रमाणे पुरावे सादर करावयाचे आहे. वयाचा पुरावा (वय १८ ते ६० वर्ष पर्यंत) शाळा सोडल्याचा दाखला/जन्म प्रमाणपत्र, रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड/आधार कार्ड, मागील वर्षभरात ९० दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र, तीन पासपोर्ट आकाराचे नुकतेच काढलेले फोटो, बँक पासबुकची झेरॉक्स, नोंदणी शुल्क २५ रुपये व मासिक वर्गणी १ रुपये प्रमाणे ६० रुपये जमा करुन पावती घ्यावी. असे सहायक कामगार आयुक्त, गोंदिया यांनी कळविले आहे.
०००००जिल्ह्यात कलम ३७ (१) (३) लागू
गोंदिया : १७ ते ३१ जुलै या कालावधीत जिल्ह्यात विविध पक्ष व संघटनांकडून त्यांच्या प्रलंबीत मागण्यासंदर्भाने उपोषणे, धरणे, मोर्चे, रास्तो रोको, जेल भरो व संप इत्यादी आंदोलने आयोजित केली जात आहे. १७ जुलैपासून उच्च माध्यमिक व माध्यमिक शालांत परीक्षा सुरु होत आहे. २७ जुलैपासून नक्षल संघटना नक्षल शहीद सप्ताह साजरा करतात. या दरम्यान जिल्ह्यात शांतता व सुरक्षीतता अबाधित राखण्याच्या दृष्टीने १७ जुलै पासून ते ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबई पोलीस अधिनियमाची कलम ३७ (१) (३) चे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हरिश धार्मिक यांनी लागू केले आहे.
०००००जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत विविध योजनांसाठी अर्ज आमंत्रित
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०१९-२० या वर्षात पशुपालकांसाठी विविध योजना राबविण्यात येत असून त्यासाठी अर्जदारांकडून ३१ जुलै २०१९ पर्यंत पंचायत समिती स्तरावर अर्ज मागविण्यात येत आहेत. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) योजनेअंतर्गत दुधाळ जनावरांच्या खाद्य उपलब्धतेमध्ये सुधारणा करण्यास्तव १०० टक्के अनुदानावर वैरण बियाण्याचे वाटप, कुक्कूट विकास कार्यक्रमाअंतर्गत ५० टक्के अनुदानावर एक दिवसाची सुधारीत जातीची कुक्कूट पिल्ले वाटप व संकरीत कालवडी व सुधारीत म्हशीच्या पारड्याची जोपासना करण्यास ५० टक्के अनुदानावर खाद्य वाटप या योजनांचा समावेश आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना विशेष घटक योजनेअंतर्गत तसेच आदिवासी उपयोजना व आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी लाभार्थीसाठी ७५ टक्के अनुदानावर दुधाळ जनावरांचे गट वाटप (२ दुधाळ जनावरे), शेळ्याचे गट वाटप (१० शेळ्या व १ बोकड) तसेच ५० टक्के अनुदानावर देशी दुधाळ गोवंश वाटप इत्यादी योजनांचा समावेश आहे. या योजनेमध्ये अर्ज करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले परिपूर्ण अर्ज संबंधित पशुवैद्यकीय संस्थेच्या संस्था प्रमुखाचे शिफारसीसह ३१ जुलै २०१९ पर्यंत पंचायत समिती येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचे कार्यालयात जमा करावे. असे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद गोंदिया यांनी कळविले आहे.
०००००सुरक्षा रक्षक भर्ती शिबीर
गोंदिया : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गोंदियाच्या वतीने १९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था सडक/अर्जुनी आणि २० जुलैला शासकीय औद्योगीक प्रशिक्षण संस्था तिरोडा येथे एस.आय.एस.हैद्राबाद कंपनी यांच्यातर्फे सुरक्षा भर्ती रोजगार मेळावा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलाखती घेण्याकरीता संबंधित कंपनीचे अधिकारी मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. सदर पदाकरीता किमान शैक्षणिक पात्रता एस.एस.सी., वयोमर्यादा २० ते ३७ वर्ष, उंची १६७ से.मी. इत्यादी अटींची पूर्तता करीत असलेल्या पुरुष उमेदवारांनी लाभ घ्यावयाचा असल्यास शैक्षणिक पात्रतेची मुळ प्रमाणपत्रे व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाचे नोंदणी कार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी या मेळाव्याचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
०००००