पोलीस अधिक्षक शिंदेनी स्विकारला पदभार

0
27

गोंदिया,दि.१7ः–  गोंदियाचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून पुण्यावरुन आलेले पोलीस उपायुक्त मंगेश पोपटराव शिंदे यांनी आज बुधवारला मावळत्या पोलीस अधिक्षक विनीता साहू यांच्याकडून पदभार स्विकारला आहे.साहू यांची मुंबई मुख्यालयात पोलीस उपायुक्त बदली झाली आहे. श्रीमती साहू यांच्या कार्यकाळात पाहिजे तसे गुन्हेगारीवर अंकुश ठेवले गेले नव्हते तसेच जुगार,क्रिकेट सट्टा व अवैध धंद्यांना मोठ्या प्रमाणात ऊत आले होते.त्यावर नवे पोलीस अधिक्षक काय अंकुश लावतात याकड़े लक्ष लागले आहे.