पुन्नुर फाट्याजवळ आढळली नर्मदाच्या सुटकेसाठीचे पत्रक

0
34

गडचिरोली,दि.१७ःः पश्चिम सब झोनल ब्युरो गडचिरोली दंडकारण्याच्यावतीने दंडकारण्य चळवळीचे नेते कॉ.नर्मदा(निर्मला),किरण(सत्यानारायण)ला महाराष्ट्र पोलिसांनी केलेली अटक चुकीची असून त्यांना बिनशर्त सोडण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.सोबतच त्यांच्या सुटकेसाठी मानवाधिकार कार्यकत्र्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आल्याचे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याती कसनसूर पोलीस चौकी परिसरातील पुन्नुर फाट्याजवळ आढळलेल्या पत्रकावरुन स्पष्ट होत आहे.पत्रकामध्ये २८ जुर्ले ते ३ ऑगस्टपर्यंत अमर शहिद सप्ताह साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.साम्राज्यवादी,दलाल नौकरशाही,पुंजीपती वर्गाच्या विरोधात आमची पार्टि जनतेकरीता जनयुध्द करीत असल्याचे उल्लेख आहे.चारु मुजुमदार,कन्हाई चटॅर्जीसारख्या १२५ कॉमरेडसने आपले जिवन या संघर्षाला समर्पित केल्याचा उल्लेख करीत खोट्या चकमकी दाखवून कॉमरेडसना ठार केल्याचा उल्लेख त्या पत्रामध्ये दिसून येत आहे.