माध्यमिक व उच्च माध्यमिक पुरवणी परीक्षा परीक्षा केंद्रावर कलम १४४ लागू

0
15

गोंदिया,दि: १९ :: माध्यमिक व उच्च माध्यमिक पुरवणी परीक्षा जुलै-२०१९ ही परीक्षा १७ जुलै ते ३ ऑगस्ट २०१९ या कालावधीत जे.एम.हायस्कूल मुख्य शाखा गोंदिया, आदर्श विद्यालय आमगाव, सरस्वती विद्यालय अर्जुनी/मोरगाव, शहिद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल गोरेगाव, गोरकाबाई कन्या हायस्कूल तिरोडा, एस.एस.अग्रवाल म्युन्सीपल गर्ल्स हायस्कूल गोंदिया, मनोहर म्युन्सीपल हायर सेकंडरी स्कूल स्टेडियम जवळ गोंदिया, मनोहरभाई पटेल हायस्कूल देवरी, वीर बिरसामुंडा आदिवासी आश्रमशाळा सालेकसा, त्रिवेण हायस्कूल सडक/अर्जुनी, मनोहर नगरपरिषद ज्युनियर कॉलेज गोंदिया, जि.प.ज्युनियर कॉलेज सडक/अर्जुनी आणि शहिद मिश्रा ज्युनियर कॉलेज तिरोडा अशा एकूण १३ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्राच्या २०० मीटर परिसरात १७ जुलैपासून ते ३ ऑगस्टपर्यंत कोणत्याही प्रकारचे अस्त्र, शस्त्र व कुठल्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक उपकरणे जसे- कॅलक्युलेटर, मोबाईल, लॅपटॉप, पेजर, फॅक्स मशीन, झेरॉक्स मशीन इत्यादींचा वापर करण्यास किंवा जवळ बाळगण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे.
या परीक्षा प्रक्रिये दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ ची कलम १४४ चे मनाई आदेश लागू करण्यात आले आहे. हे आदेश १७ जुलैपासून ते ३ ऑगस्टपर्यंत सकाळी १० वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी हरिष धार्मिक यांनी कळविले आहे.