आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनाच;लाभार्थ्यांनी ‘गोल्डन कार्ड’ प्राप्त करून घेण्याचे आवाहन

0
10

वाशिम, दि. २० : आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून वाशिम जिल्ह्यातील १ लक्ष ३५ हजार ५५३ कुटुंबांना ५ लक्ष रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार देण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपले सरकार सेवा केंद्र अथवा महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचे अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी व गोल्डन कार्ड प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के यांनी केले आहे.

राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजनेच्या गोल्डन कार्डधारकांना सुद्धा आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. हे कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर यासह महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या वाशिम येथील जिल्हा सामान्य रुग्णालय, देवळे हॉस्पिटल, कानडे हॉस्पिटल, बिबेकर हॉस्पिटल व बाहेती हॉस्पिटल येथील आरोग्य मित्रांना भेटून नोंदणी करावी. आपले सरकार सेवा केंद्र, कॉमन सर्व्हिस सेंटर येथून कार्ड प्राप्त करून घेण्यासाठी प्रती व्यक्ती ३० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. अंगीकृत रुग्णालयामध्ये याकरिता कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. वाशिम जिल्ह्यातील १ लक्ष ३५ हजार ५५३ कुटुंबातील ४ लक्ष ५९ हजार ६४१ व्यक्तींना गोल्डन कार्ड देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

आयुष्मान भारत योजनेसाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांची यादी कॉमन सर्व्हिस सेंटर, ग्रामपंचायतीमध्ये नियुक्त डाटा एन्ट्री ऑपरेटर व प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध आहे. या यादीमध्ये नाव असलेल्या सर्व लाभार्थ्यांनी गोल्डन कार्ड तयार करण्यासाठी शिधापत्रिकामाननीय प्रधानमंत्री प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे वितरीत करण्यात आलेले पत्र आणि आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे. एखाद्या कुटुंबास माननीय प्रधानमंत्री यांचे स्वाक्षरीचे पत्र वितरीत झाले नसेल व त्यांचे नाव लाभार्थी यादीत असेल तर त्यांनी शिधापत्रिका व आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय येथील अनिल खंदारे (भ्रमणध्वनी क्र. ९४२३५०००४०), कानडे बाल रुग्णालय येथील खालिक खान, विठ्ठल चौधरी (भ्रमणध्वनी क्र. ८२७५०९५१०२), देवळे हॉस्पिटल येथील गजानन पाटील, जगदीश महाले (भ्रमणध्वनी क्र. ८२७५०९५१०३), बिबेकर हॉस्पिटल येथील राजेंद्र हेंद्रे, नूर मोहमंद (भ्रमणध्वनी क्र. ८२७५०९४४९१) व बाहेती हॉस्पिटल येथील अजय वंजारे, नदीम शेख (भ्रमणध्वनी क्र. ९४२३५००१०२) या आरोग्यमित्रांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांनी केले आहे.