आदिवासी सुशिक्षित बेरोजगारांना विनामुल्य स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणाची संधी

0
20
  • २६ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

वाशिम, दि. २० : राज्य शासनाच्या अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथील आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राच्यावतीने शासनाद्वारे घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी सुशिक्षित बेरोजगार आदिवासी उमेदवारांना विनामुल्य प्रशिक्षण दिले जाते. साडेतीन महिन्यांच्या या प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना प्रतिमाह एक हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. तसेच प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा अभ्यास करण्यासाठी विविध विषयाच्या चार पुस्तकांचा संच विनामुल्य देण्यात येतो.

१ ऑगस्ट २०१९ पासून सुरु होणाऱ्या दुसऱ्या सत्रातील प्रशिक्षण सत्रासाठी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज २६ जुलै २०१९ पर्यंत उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रजयस्थंभ चौकमातोश्री मंगल कार्यालयामागे लालपूल जवळअचलपूरकॅम्पपरतवाडाता. अचलपूरजि. अमरावती (०७२२३-२२१२०५) येथे किंवा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व सहाय्य केंद्रधारणीजि. अमरावती येथे सादर करावेत.

उमेदवार हा आदिवासी प्रवर्गातील किमान एसएससी उत्तीर्ण असणाऱ्या व १ डिसेंबर २०१९ रोजी १८ वर्षे पूर्ण करणारा परंतु १५ नोव्हेंबर २०१९ रोजी ३० वर्षे पूर्ण केलेला नसावा. सध्या कोणतेही शिक्षणप्रशिक्षण घेत नसलेल्या इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखलाएसएससी उत्तीर्णची गुणपत्रिका,उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र ऑनलाईन कार्ड (https://rojgar.mahaswayam.in), आदिवासी विकास कार्यालयात प्रकल्प अधिकारी यांच्याकडे नांव नोंदविल्याचे नोंदणी कार्ड इत्यादी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती व एक छायाचित्र जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नयेअसे अचलपूर येथील आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्रामार्फत कळविण्यात आले आहे.